Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; पगारही आहे भरपूर

11

KKSU University Nagpur Recruitment 2023: तुम्ही जर संस्कृत विषयात करिअर केले असेल आणि अध्यापन क्षेत्रात नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत भरती प्रकिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यज प्राध्यापक या पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

नुकतीच विद्यापीठाने याबाबत अधिसूचना जाहीर केली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १५ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहयोगी प्राध्यापक – ०१ जागा
सहाय्यज प्राध्यापक – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०९ जागा

शैक्षणिक पात्रता:
सहयोगी प्राध्यापक: या पदासाठी ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबधित विषयात पीएचडी आणि ०८ वर्षे अध्यापनाचा अनुभव हवा. संशोधन आणि शोधनिबंध यूजीसी मान्यताप्राप्त जर्नल मधून प्रकाशित झालेले आसवे.

सहायक प्राध्यापक – या पदासाठी ५५ टक्क्यांहून अधिक गुणांसह संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी आणि यूजीसी द्वारे घेतली जाणारी नेट(NET) किंवा सेट (SET) ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(याशिवाय अधिक विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)

(वाच: Mumbai Port Trust Bharti 2023: ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’मध्ये मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

वेतन:
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ३१ हजार ४०० ते २ लाख १७ हजार १०० रुपये
सहायक प्राध्यापक – ५७ हजार ७०० ते १ लाख ८२ हजार ४००

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर, ४४११०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: SEEPZ Mumbai Recruitment 2023: सीप्ज मुंबई अंतर्गत विशेष भरती, ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.