Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील

9

Dalmia Lions College Recruitment 2023: तुम्ही प्रोफेसर पदासाठीचे शिक्षण घेतले असेल आणि तुम्हाला अध्यापन क्षेत्रात करियर कारचे असेल तर मुंबईमध्ये एक खास संधी चालून आली आहे. मुंबईच्या प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत महाविद्यालयाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीद्वारे विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत हा अर्ज सादर करायचा आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.

‘प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज, भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक प्राध्यापक (इंग्लिश) : ०२ जागा
सहाय्यक प्राध्यापक (इकॉनॉमिक्स) : ०१ जागा
सहाय्यक प्राध्यापक (कॉमर्स) : ०१ जागा
सहाय्यक प्राध्यापक (स्टॅटीस्टिक्स) : ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: १० जागा

शैक्षणिक पात्रता: यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदासाठी आवश्यक असणार्‍या सर्व शैक्षणिक पात्रतेची पूर्तता केलेली असावी.

(वाचा: Job Resign Tips: नोकरीचा राजीनामा देताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा…)

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २३ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्राचार्य, प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, एस.व्ही. रोड, सुंदर नगर, मालाड (प), मुंबई – ४००६४.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत हा अर्ज करायचा आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: KNS Bank Recruitment 2023: मुंबईच्या कुर्ला नागरिक सहकारी बँकेत भरती; व्यवस्थापक ते शिपाई पदांसाठी आजच अर्ज करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.