Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

13

Kavikulaguru Kalidas Sanskrit University Recruitment 2023: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीद्वारे विद्यापीठातील काही महत्वाची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कुलसचिव, वित्त आणि लेखाधिकारी, परीक्षा नियंत्रक या पदांचा समावेश आहे. नुकतीच विद्यापीठाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

त्यामुळे नागपूरकरांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १५ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कुलसचिव – ०१ जागा
वित्त आणि लेखाधिकारी – ०१ जागा
परीक्षा नियंत्रक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता: संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि १५ वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा अनुभव. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)

वेतन:
कुलसचिव : १ लाख ३१ हजार १०० ते २ लाख १६ हजार ६००
वित्त आणि लेखाधिकारी – १ लाख ३१ हजार १०० ते २ लाख १६ हजार ६००
परीक्षा नियंत्रक – ३७ हजार ४०० ते ६७ हजार

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा ५३ वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, मौदा रोड, रामटेक, जिल्हा नागपूर – ४४१ १०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: BHEL Recruitment 2023: ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.