Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावी ते पदवीधरांसाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पुणे येथे विविध पदांची भरती

8

New English School and Junior College Pune Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विषयांचे शिक्षण तसेच शिपाई आणि वाहनचालक यांची भरती करण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये एकूण १९ हून अधिक पदांचा समावेश आहे.

नुकतीच न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पुणे यांनी याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या मुलाखती २९ आणि ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया

‘न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक शिक्षक
अर्थशास्त्र – ०१ जागा
इतिहास / राज्यशास्त्र – ०२ जागा
गणित – ०२ जागा
संगणक विज्ञान (बायफोकल) – ०२ जागा
माहिती तंत्रज्ञान – ०२ जागा
O.C.M./ अकाउंट्स – ०२ जागा
चित्रकला शिक्षक – ०२ जागा
शारीरिक शिक्षण – ०२ जागा
संस्कृत शिक्षक – ०१ जागा
अबॅकस (ABACUS) शिक्षक – ०१ जागा
(प्री-स्कूल शिक्षक, शिपाई आणि वाहनचालक या पदांच्या रिक्त जागांचे तपशील उपलब्ध नाहीत)
एकूण रिक्त पदसंख्या: १९ हून अधिक

(वाचा: Maha Metro Recruitment 2023: ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मध्ये भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

पात्रता:
सहाय्यक शिक्षक पदासाठी संबधित विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी म्हणजेच पदाच्या आवश्यकतेनुसार एमए बीएड/ एमएससी बीएड, बीए बीएड किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शिपाई आणि वाहन चालक पदासाठी उमेदवार दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा. चालकास बस चालवण्याचा अनुभव आणि संबधित परवाना असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख :२९, ३० नोव्हेंबर आणि ०१ डिसेंबर २०२३.

मुलाखतीचा पत्ता : न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुणे, क्र.. ३११/ ५ , ससाणे नगर, हडपसर, पुणे, ४११०२८.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पुणे,’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: ROF Maharashtra Recruitment 2023: राज्याच्या ‘आरओएफ’ विभागात दहावी पास उमेदवारांसाठी भरती, आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.