Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘बँक ऑफ बडोदा’मध्ये पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज

8

Bank of Baroda Recruitment 2023: तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या कोल्हापूर येथील क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘बँक मित्र पर्यवेक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे तुम्ही पदवीधर असाल आणि कोल्हापुरात काम करण्याची इच्छा असेल तर आजच अर्ज करा. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून २५ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘बँक ऑफ बडोदा कोल्हापूर शाखा भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
बँक मित्र पर्यवेक्षक : ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. त्याला संगणक ज्ञान आवश्यक आहे. एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट याची माहिती असायला हवी. तसेच एम. एस्सी. (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए/एमबीए आदि शाखांतील शिक्षण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

(वाचा: MPCB Mumbai Recruitment 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

वयोमर्यादा : किमान २१ वर्षे ते कमाल ४५ वर्षे. या भरतीकरिता सेवानिवृत्त व्यक्ती अर्ज करत असल्यास त्यांच्यासाठी ६५ वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्षेत्रीय प्रमुख, बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालय, दूसरा मजला, जेम्सस्टोन, विचारे कोम्प्लॅक्स, सी. बी. एस. जवळ, कोल्हापूर – ४१६००२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Career In Railways After 12th: बारावीनंतर थेट रेल्वेमध्ये नोकरी हवीय? मग जाणून घ्या ‘टीटीई’ विषयी खास माहिती)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.