Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या भरतीमध्ये फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेंटल हायजेनिस्ट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डाटा एंट्री ऑपरेटर, आशा गटप्रवर्तक या पदांचा समावेश आहे. एकूण २३ रिक्त जागा भरण्यात येणार असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ०७ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रकिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
फिजीशियन – ०३ जागा
स्त्रीरोगतज्ञ – ०२ जागा
रेडिओलॉजिस्ट – ०१ जागा
भुलतज्ञ – ०६ जागा
बालरोगतज्ञ – ०२ जागा
सर्जन – ०३ जागा
कार्डिओलॉजिस्ट – ०१ जागा
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – ०१ जागा
डेंटल हायजेनिस्ट – ०१ जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – ०१ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर – ०१ जागा
आशा गटप्रवर्तक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २३ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(वाचा: Career Tips: करिअरमध्ये कामाचा कम्फर्ट झोन शोधताय? मग आजच त्यातून बाहेर पडा; ‘ही’ आहेत त्यामागील पाच कारणे)
वेतन: (मासिक)
फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन – ७५ हजार
कार्डिओलॉजिस्ट – १ लाख २५ हजार
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – ३५ हजार
डेंटल हायजेनिस्ट – १७ हजार
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – ३५ हजार
डाटा एंट्री ऑपरेटर – १८ हजार
आशा गटप्रवर्तक – ८ हजार १२५
नोकरी ठिकाण : कोल्हापूर
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०७ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Namo Maharojgar Melava 2023: ‘या’ दिवशी होणार शासनाचा ‘नमो महारोजगार मेळावा’; जाणून घ्या सर्व तपशील)