Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय वायु सेनीतील या भरतीसाठी आवश्यक असणार्या Air Force Common Admission Test (AFCAR-01/2024) ही १६ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार असल्याचा अंदाज आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : भारतीय हवाई दल (Indian Air Force Recruitment 2023)
भरले जाणारे पद : फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
एकूण रिक्त जागा : ३१६ जागा
फ्लाइंग शाखा : ३८ जागा
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) : १६५ जागा
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) : ११४ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० डिसेंबर २०२३
वयोमर्यादा :
फ्लाइंग शाखा :
या शाखेतील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांची वयोमर्यादा २० ते २४ वर्षे दरम्यान ठेवण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
तांत्रिक-गैर-तांत्रिक गट :
या शाखेतील जागांसाठी अर्ज करणार्या वयोमर्यादा २० ते २६ वर्षे ठेवली आहे. १ जानेवारी २०२५ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
निवड प्रक्रिया :
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल.
- उमेदवारांना नियोजित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विहित तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. याशिवाय, कोणत्याही उमेदवाराचा चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
वेतन :
निवडलेल्या उमेदवारांना ७ व्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.
त्यानुसार, उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार दिला जाणार आहे.
महत्त्वाचे :
- सदर भरतीच्या प्रारंभाच्या वेळी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणादरम्यान किंवा कोर्स सुरू असताना उमेदवाराला लग्न करण्याची परवानगी नाही.
- दरम्यानच्या काळात लग्न केल्यास प्रशिक्षण बंद करून सदर उमेदवार शासनाला सर्व खर्च परत करण्यास जबाबदार असेल.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
4. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२३ आहे.
(वाचा : AFCAT Recruitment 2024: एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२४ साठी अर्ज सुरू झाले, असा करा अर्ज)