Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती; आजच करा अर्ज..

8

Bank of Baroda Recruitment 2023: तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात असाल आणि नोकरीच्या शोधात असाल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती सुरू आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या अंतर्गत ‘वरिष्ठ व्यवस्थापक’ पदांसाठीची महाभरती सुरू आहे. याभरतीद्वारे २५० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच ‘बँक ऑफ बडोदा’ने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर ही. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.

‘बँक ऑफ बडोदा भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरिष्ठ व्यवस्थापक – २५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २५० जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. तसेच ‘एमबीए’ फायनान्स किंवा मार्केटिंग किंवा त्या समकक्ष अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असवा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Mahaparinirvan Din 2023: बाबासाहेब होते म्हणून सर्वांना मिळणं सोप्पं झालं; जाणून घ्या शिक्षण क्षेत्रातील खास योगदान)

वयोमर्यादा : किमान २८ वर्षे ते कमाल ३७ वर्षे

अर्ज शुल्क : खुल्या आणि ओबीसी प्रवारगळा ६०० रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी. एसटी आणि राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये अर्ज आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: NHM Ratnagiri Recruitment 2023: रत्नागिरी येथे आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.