Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २२ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सहाय्यक प्राध्यापक – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयातील पदव्युत्तर पदविका म्हणजेच एम.डी. पदवी, डी.एन.बी किंवा एम.एस. असणे आवश्यक आहे.
वेतन : १ लाख रुपये (मासिक)
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे. कमाल वयोमर्यादेत मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात आली आहे.
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२३
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : २६ डिसेंबर २०२३
मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव (पूर्व)
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगर पालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज रुग्णालयातील मुख्य लिपिक यांच्याकडून प्राप्त करून शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २२ डिसेंबर २०२३ आधी त्यांच्याकडेच प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.