Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये भरती, आजच करा अर्ज

10

GIC Recruitment 2023 : तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीमध्ये मुख्य वित्त अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘जीआयसी’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
मुख्य वित्त अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच तो ‘आयसीएआय’ या भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट संस्थेचा सदस्य असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

CIDCO Recruitment 2023: ‘सिडको’ मध्ये पदवीधरांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : किमान ४५ वर्षे ते कमाल ५५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.