Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंजिनियर्ससाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये महाभरती; आजच करा अर्ज

12

Steel Authority of India Limited Recruitment 2023: तुम्ही जर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनियरिंगची पदवी घेतली असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी चालून आली आहे. ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अंतर्गत मोठी भरती सुरू आहे. या भरतीमध्ये ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, तांत्रिक विभाग’ या पदाच्या एकूण ९२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३१ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
केमिकल – ०३ जागा
सिव्हिल – ०३ जागा
इलेक्ट्रिकल – २६ जागा
इंस्ट्रुमेंशन – ०७ जागा
मेकॅनिकल – ३४ जागा
मेटलर्जी – ०५ जागा
मायनिंग – १४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ९२ जागा

Goa RMSA Recruitment 2023: ‘गोवा समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत मोठी भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून किमान ६५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वेतनश्रेणी : ५० हजार ते १ लाख ६० हजार (मासिक)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.