Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

12

Pune Mahanagarpalika Recruitment 2023: तुम्ही पशुवैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि पुण्यामध्ये संधी शोधत असाल तर एक उत्तम नोकरी चालून आली आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत विशेष भरती सुरू आहे. ज्यामधे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच पालिकेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्रनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १४ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पुणे महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
पशुवैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

NHM Amravati Recruitment 2023: योग प्रशिक्षकांसाठी अमरावती जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तेच त्याला संबधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण : पुणे

वेतन : ४५ हजार (मासिक)

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -०५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १४ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.