Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया १४ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे तर २३ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘मिरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार विज्ञान शाखेतून पदवीधर किंवा १० + २ विज्ञान MPW/LHV/ANM/ आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वेतन – १५ हजार ५०० (मासिक)
नोकरी ठिकाण – मिरा भाईंदर
वयोमर्यादा – कमाल वय ६५ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मिरा भाईंदर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २३ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.