Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मोठी भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

12

Bharat Electronics Limited Recruitment 2023: तुम्ही इंजिनियरिंग, एमबीए, एमएसडब्ल्यू किंवा अन्य अभ्यासक्रमातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ‘बीईएल’ म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. या कंपनी अंतर्गत मोठी भरतीप्रक्रिया राबवण्यात आली आहे. ज्यामधे प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी अशा विविध पदांच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच भारत इलेक्ट्रॉनिक्सने या संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्रशिक्षणार्थी अभियंता – २० जागा
प्रकल्प अभियंता – ३० जागा
प्रकल्प अधिकारी – ०१ जागा
प्रकल्प अभियंता (साहित्य व्यवस्थापन) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५२ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात अभियांत्रिकी, एमबी, एमएसडब्ल्यू किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण असावा. प्रत्येक पदाची विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

SAIL Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये महाभरती; आजच करा अर्ज
वेतन: (मासिक)
प्रशिक्षणार्थी अभियंता – ३० हजार ते ४० हजार
प्रकल्प अभियंता – ४० हजार ते ५५ हजार
प्रकल्प अधिकारी – ४० हजार ते ५५ हजार
प्रकल्प अभियंता (साहित्य व्यवस्थापन) – ४० हजार ते ५५ हजार

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची रीख : २६ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.