Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या भरतीद्वारे ‘स्टाफ नर्स’ पदाच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १८ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
स्टाफ नर्स – ८१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८१ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार GNM कोर्स किंवा B.SC Nursing उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र नर्संग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक आहे.
वेतन : २० हजार (मासिक)
नोकरी ठिकाण : नागपूर
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गाकरीता ४३ वर्षे आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नागपूर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.