Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यामध्ये कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

13

COSMOS Co operative Bank Pune Recruitment 2023: तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. ही भरती पुणे शाखेसाठी होणार आहे. यामध्ये लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक या पदांचा समावेश आहे.

नुकतीच कॉसमॉस बँकेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाथी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.

‘कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
लिपिक – ०१ जागा
विक्री कार्यकारी – ०१ जागा
क्रेडिट प्रक्रिया अधिकारी – ०१ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी – ०१ जागा
विक्री व्यवस्थापक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०५ जागा

Exim Bank Recruitment 2023: इंडिया एक्झिम बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात ६० टक्के गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण :
पुणे

वयोमर्यादा : (कमाल)
लिपिक – २८ वर्षे
विक्री कार्यकारी – ३५ वर्षे
क्रेडिट प्रक्रिया अधिकारी – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी – ३५ वर्षे
विक्री व्यवस्थापक – ३५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कॉसमॉस को. ऑप. बँक’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.