Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्याच्या ‘डी. वाय. पाटील इंस्टिट्यूट’मध्ये भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

12

D Y Patil Institute of Technology Pune Recruitment 2023: पुण्यामध्ये नोकरी शोधत असाल तर एक उत्तम संधी चालून आली आहे. ‘डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ पुणे यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन या पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईनम्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे,पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे भरती २०२३ मधील पदे :
टिचिंग स्टाफ – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (विविध विषयातील)
नॉन टिचिंग स्टाफ – मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन

TISS Recruitment 2023: मुंबईच्या ‘टीआयएसएस’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सर्व पदांची अर्हता ‘यूजीसी’च्या निकषानुसार लागू आहे. त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली असून त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाइन ई-मेल द्वारे

ई-मेल पत्ता : info.engg@dypvp.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २४ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.