Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डीटीपी मधील यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. यासोबतच, रोजगार व स्वयंयोजनालयाच्या http://ese.mah.nic.in/ या वेबसाइटवरही ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पदांचा तपशील :
संस्था : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Department of Town Planning and Valuation, Government of Maharashtra)
एकूण रिक्त पदे : १२५ जागा
भरले जाणारे पद : शिपाई (गट-ड )
नोकरीचे ठिकाण : पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सदर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.
- तसेच, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
- शासन निर्णय आणि तरतुदींनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट हि यांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील.
वेतन विषयक :
१५ हजार ते ४७ हजार ६०० रुपयांपर्यत (शिवाय, नियमानुसार अनुज्ञेय भत्ते)
परीक्षा शुल्काविषयी :
राखीव प्रवर्ग : ९०० रुपये
अराखीव प्रवर्ग : १००० रुपये
(उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील)
वेबसाइट तपासात राहणे अनिवार्य :
० शासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील देण्यात आला आहे.
० अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा तपशील अधिकृत वेबसाइटवर ‘सर्वसाधारण सूचना’मध्ये प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
० भरती प्रक्रियेतील तारखांमधील बदल, सूचना आणि इतर सगळ्या तपशीलाची माहिती वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवरच प्रसिद्ध करण्यात येईल.
० त्यासाठी उमेदवाराने वेबसाइट तपासात राहणे अनिवार्य असेल.
उमेदवारांनी याकडे लक्ष द्या :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. .
- भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.