Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशाच्या संरक्षण दलात अधिकारी म्हणून काम करायचे आहे? एसपीआय प्रवेश अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात, मुला-मुलींना करता येणार अर्ज

8

SPI Admission 2024 : राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या निमित्ताने लष्करभरती प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

संभाजी नगर आणि नाशिक येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशाची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जून २०२४ पासून छत्रपती संभाजीनगर मुलांच्या सेवा संस्था प्रवेशाच्या ४८ व्या कोर्ससाठी आणि मुलींसाठी नाशिक येथे दुसऱ्या कोर्स प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी या आहेत पात्रता आणि अटी :
1. येथे प्रवेश घेण्यासाठी अविवाहित असणे ही महत्वाची अट आहे.
2. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांतील मुले आणि मुली या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत.
3. ०२ जानेवारी २००७ आणि ०१ जानेवारी २०१० दरम्यान जन्म झालेल्या उमेदवारांना येथे प्रवेश दिला जाणार आहे.
4. उमेदवाराने मार्च / एप्रिल / मे २०१४ मध्ये राज्य मंडळाकडून १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे गरजेचे आहे.
5. तसेच मार्च / एप्रिल / मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा किंवा बसणारी व जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ही पात्र ठरणार आहेत.

पात्रता :
विद्यार्थी सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांमध्ये पात्र असावा.

1. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांमध्ये उमेदवार पात्र असावा. हे निकष UPSC आणि संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
2. आवश्यक ऊंची : १५७ सेमी
3. आवश्यक वजन : ४३ किलो.ग्रॅ.
4. छाती : न फुगवता – ७४ सेमी, फुगवून – ७९ सेमी
5. रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा.
6. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी अशी अट आहे.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीविषयी :

पात्र उमेदवारांची २८ एप्रिल २०२४ (तारखेत बदल होण्याची शक्यता) रोजी विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा पद्धतीविषयी :

  • ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असून प्रश्नपत्रिका ही इंग्रजीत भाषेत असेल.
  • सदर परीक्षा ६०० गुणांची असून यात, एकूण १५० प्रश्न असतील. यातील गणित विषयावर आधारित ७५ प्रश्न तर सामान्य ज्ञानावर आधारित ७५ प्रश्न विचारले जटिल.
  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
  • लेखीपरीक्षेत साधारणपणे राज्य बोर्ड आणि सीबीएसई इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.
  • या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारां मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

असा करा अर्ज :

1. मुलांसाठी ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी ऑनलाइन अर्ज www.girlspinashik.com वर उपलब्ध आहेत.
2. परीक्षा शुल्क रु. ४५० रुपये राहणार असून हे पैसे विनापरवाना तत्वावर भरावे लागणार आहेत. हे परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना भरता येणार आहे.
3. परीक्षा शुल्क डीडी किंवा चलन माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.
4. आवश्यक अटी व शर्तींनुसार अर्ज भरला नाही तर अर्ज नाकारला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही यादी नोंद उमेदवारांनी घ्यावी.
5. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे.

परीक्षेचे हॉल तिकीट :
परीक्षेचे हॉल तिकीट हे वर दिलेल्या वेबसाइटवरुन दि. १० एप्रिल २०२४ नंतर डाउनलोड करता येणार आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी spiaurangabad.com या संकेतस्थळावर भेट द्यावी तर मुलींनी www.girlspinashik.com या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षेशी संबंधित सर्व सूचना या वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.