Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

12

Airport Authority Of India Recruitment 2024: तुम्ही अभियांत्रिकी शिक्षण, पदवीधर किंवा बारावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक या पदांच्या एकूण ११९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच प्राधिकरणाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २७ डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २६ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील जाणून घेऊया.

BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

‘भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
कनिष्ठ सहाय्यक – ७५ जागा
वरिष्ठ सहाय्यक – ४४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११९ जागा

शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ सहाय्यक – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि संबधित विषयातील ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा उत्तीर्ण असावा. किंवा पदानुसार बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा

वरिष्ठ सहाय्यक – संबधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा आणि दोन वर्षांचा अनुभव असावा. तसेच अकाऊंट विभागसाठी वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा.

याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतनश्रेणी :
कनिष्ठ सहाय्यक – ३१ हजार ते ९२ हजार
वरिष्ठ सहाय्यक – ३६ हजार ते १ लाख १० हजार

अर्ज पद्धती :ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २७ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.