Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mokshada Ekadashi 2023: आज मोक्षदा एकादशी, धनवृद्धीसाठी करा हे उपाय, नवीन वर्षात होईल धनवर्षाव !

10
मोक्षदा एकादशी ही वर्षाची शेवटची एकादशी असून या दिवशी धनवृद्धीचे उपाय केल्यास नवीन वर्षात धन, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व खूप खास मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास नवीन वर्षात तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळतील. पाहा काय आहेत हे खास उपाय.

ही मूर्ती घरी आणा
मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता उर्जा येते तसेच पैशांचा ओघ वाढतो. तुम्हाला हवं असेल तर ही मूर्ती तुम्ही घराच्या देवघरात ठेवू शकता किंवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवू शकता. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.

तुळशीचा उपाय
मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा तुमच्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीत तुपाचा दिवा लावावा आणि २१ वेळा प्रदक्षिणा घालून ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे तुळस अत्यंत प्रिय आहे. हा उपाय केल्याने भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर सदैव राहील तसेच तुम्हाला पैशाची कधी ही कमतरता भासणार नाही.

गरजूंना दान करा
मोक्षदा एकादशीला गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्त्रदान करावे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान केल्याने शंभर यज्ञांइतके पुण्य प्राप्त होते. हिवाळ्यात येणाऱ्या या एकादशीला तुम्ही लोकरीचे कपडे दान केले तर तुमचे पुण्य अनेक पटींनी वाढते आणि तुमच्या घरातील धनधान्य सदैव भरलेले राहील.

उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यासाठी उपाययोजना
नवीन वर्षात तुम्हाला उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मोक्षदा एकादशीला तुळशीची जपमाळ घेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कराव. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढेल. हा उपाय केल्यामुळे नवीन वर्षात कमाईचे नवे मार्ग खुले होतील तसेच पैशांशी संबंधित योजनांचा लाभ मिळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.