Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवी मुंबईच्या ‘ईएसआयएस’ रुग्णालयात भरती; पगारही आहे भरपूर

9

ESIS Navi Mumbai Hospital Recruitment 2024: वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी नवी मुंबई येथे एक खास संधी आहे. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या संस्थेच्या नवी मुंबई येथील रुग्णालयासाठी काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्यामधे सर्जन (अंशवेळ विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक सर्जन (अर्धवेळ), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) या पदांचा समावेश आहे.

नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून एकूण ०८ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. तर २८ डिसेंबर आधी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष रुग्णालयात जाणून अर्ज सादर करायचा आहे. तेव्हा तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
सर्जन (अंशवेळ विशेषज्ञ) – ०१ जागा
ऑर्थोपेडिक सर्जन (अर्धवेळ) – ०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०८ जागा

Parbhani Recruitment 2024: परभणी जिल्हा आरोग्य विभागात भरती, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात एमबीबीएस आणि पीजी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. या व्यतरिक्त विस्तृत पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन: (मासिक)
सर्जन (अंशवेळ विशेषज्ञ) – ६० हजार आणि अतिरिक्त कामाचा भत्ता
ऑर्थोपेडिक सर्जन (अर्धवेळ) – ६० हजार आणि अतिरिक्त कामाचा भत्ता
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – शैक्षणिक पात्रतेनुसार ७५ हजार ते ८५ हजार

नोकरी ठिकाण – नवी मुंबई / वाशी

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन/ प्रत्यक्ष

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र कर्मचारी स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल, वाशी नवी मुंबई.

मुलाखतीची तारीख – २९ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही मुलाखत प्रक्रिया संबधित दिलेल्या स्थळी २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहे. मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.