Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र काँग्रेसला प्रभारी मिळाला, देवरांकडे नवी जबाबदारी, पायलट छत्तीसगडचे प्रभारी

9

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून पक्षातील विविध राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वांच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रमेश चेन्निथला यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून देवरा यांची नियुक्ती संयुक्त खजिनदारपदी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी शनिवारी या नियुक्ता जाहीर केल्या. काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी प्रभारी एच.के.पाटील यांची वर्णी कर्नाटकच्या मंत्रिमंडळात लागल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते. याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत बरीच उत्सुकता लागून राहिली होती. या पदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बरीच चढाओढ सुरु असतानाच शनिवारी पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी रमेश चेन्निथला यांच्याकडे सोपविली आहे. त्यांच्याशिवाय मोहन प्रकाश यांच्या खांद्यावर बिहारचे प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मेघालय, मिझारोम आणि अरुणाचल प्रदेशची जबाबदारी डॉ. चेल्लाकुमार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर माणिकराव ठाकरे यांच्याकडे गोवा, दिव आणि दमण, दादरा नगर हवेलीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंदीगडची धुरा देण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रियांका गांधी यांच्याकडे सध्या कोणत्याही राज्याची जबाबदारी नसली तरी त्या पक्षाच्या सरचिटणीस म्हणून काम पाहतील.
भाजप पाठोपाठ आता दिल्लीतील काँग्रेसचाही अधिकृत पत्ता बदलणार; इंदिरा भवनात लवकरच स्थलांतर
अखिल भारतीय काँग्रेस समितीने प्रभारींचे नावे जाहीर करताना इतरही नियुक्ता यावेळी जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने अजय माकन यांच्याकडे खजिनदारपदाची धुरा सोपविण्यात आली असून संयुक्त खजिनदार पदासाठी माजी खासदार मिलिंद देवरा आणि विजय सिंगला यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचवेळी पक्षाने महासचिव तारिक अन्वर, भक्ता चरण, हरिष चौधरी, रजनी पाटील आणि मनिष चत्राथ यांच्या बजाविलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
….असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर तर एकनाथ शिंदे यांचं संयमाचं आवाहन

कोणावर कोणती जबाबदारी

रमेश चेन्निथला – महाराष्ट्र
मोहन प्रकाश – बिहार
डॉ. चेल्लाकुमार – मेघालय, मिझारोम आणि अरुणाचल प्रदेश
डॉ. अजोय कुमार – ओडिशा, तामिळनाडू आणि पॉण्डिचेरीचा अतिरिक्त कार्यभार
भरतसिन्हा सोलंकी – जम्मू काश्मीर
राजीव शुक्ला – हिमाचल प्रदेश आणि चंदीगड
सुखजेंद्रर रंधवा – राजस्थान
देवेंद्र यादव – पंजाब
माणिकराव ठाकरे – गोवा, दमण आणि दीव, दादरा नगरहवेली
गिरीष चोंडकर – त्रिपुरा, सिक्किम, मणिपूर, नागालँड
माणिकचम टागोर – आंध्रा प्रदेश, अंदमान आणि निकोबार
गुरुदीप सिंग सप्पल – प्रशासक
भाजप पदाधिकाऱ्यांना मोदींचे तीन मंत्र, लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना,दिल्लीतील बैठकीत काय ठरलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News

सौरभ शर्मा यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.