Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून या योजनेची आखणी केली आहे. राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. त्याचसाठी हा मेळावा आयोजित करून शासन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
तरुणांचे केवळ शिक्षण होऊन चालणार नाही तर त्यांना उत्तम संधीही मिळायला हव्या. देशासह राज्यामध्ये सध्या बेरोजगारीची मोठी समस्या आहे. म्हणूनच त्यावर ठोस उपाय करण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजना (जागेवरच निवड) राज्यात राबवली जात आहे. ज्याद्वारे शासन जिल्हया-जिल्ह्यात पोहोचत आहे. विशेष म्हणजे या मार्फत हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात गुरुवारी २८ डिसेंबर रोजी शासनाचा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होणार असून एक हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या मेळाव्यामध्येअसेंबली लाइन ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर / क्वालिटी कंट्रोल असिस्टंट / वेल्डर / फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी, आयटी / रिटेल, सिक्युरिटी गार्ड / सिक्युरिटी पर्यवेक्षक/सीसीटीव्ही ऑपरेटर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ लिंकवर नोंदणी करायची आहे.
या नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. या मेळाव्यात ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.
तसेच ‘रोजगार महास्वयम’ या लिंकवर क्लिक करून होम पेज वरील पुणे जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.
नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा
रोजगार मेळाव्याची तारीख : २८ डिसेंबर २०२३
मेळाव्याचा पत्ता: नेताजी शिक्षण संस्थेचे,सुभाष बाबुराव कुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केडगाव, ता- दौंड, जिल्हा- पुणे.