Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयसीएआरमध्ये भरती, इंजिनिअर्सना नोकरीची उत्तम संधी; ३० हजारांपर्यंत पगार

10

ICAR Recruitment 2024 : आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर जाहिरातीमधील तारखेला थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. पदभरतीची ही मुलाखत दिनांक ०२ जानेवारी २०२४ यादिवशी होणार आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग

भरले जाणारे पद :
एकूण रिक्त पदे : २ जागा

1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) : १ जागा
2) यंग प्रोफेशनल-I (पेन्शन विभाग) : १ जागा

नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : ०२ जानेवारी २०२४
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur-440033.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) पदासाठी :

संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑपरेटिंग सिस्टम/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / संगणक ग्राफिक्स मध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर

2) यंग प्रोफेशनल-I (पेन्शन विभाग) :
बी.कॉम / बीबीए / बीबीएस

वयोमर्यादा :

  • सदर भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि मुलाखतीला जाण्याच्या तयारीत असणार्‍या उमेदवारांचे वय २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत असावे.
  • SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना याबाबत ०५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना ०३ वर्षांची सूट मिळणार आहे.

महत्त्वाचे :

  • सदर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
  • शिवाय, या जागांवर निवड होणार्‍या उमेदवारांना दरमहा ३०, ००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.