Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दहावी पास उमेदवारांसाठी महाभरती

10

Government Medical College Nagpur Recruitment 2024: तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नागपूर मध्ये एक उत्तम संधी चालून आली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या अंतर्गत महाभरती सुरू आहे. या भरतीद्वारे चतुर्थ श्रेणी वर्गातील म्हणजेच गट- ड मधील एकूण ६८० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नुकतीच रुग्णालय प्रशासनाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. यापदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २० जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
गट ड (वर्ग-४) मधील अनेक पदे – ६८० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६८० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – किमान १८ वर्षे ते कमल ३८ वर्षे (कमाल वयोमर्यादेत मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षांची सवलत आहे.)

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आहे.,

अर्ज पद्धती – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ३० डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.