Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवीन वर्ष शाहरुख खानसाठी ठरलं फायद्याचं,’डंकी’साठी १ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस

7

मुंबई– डिसेंबर २०२३ च्या अंती प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा चित्रपट डंकी २०२४ मध्ये दिमाखात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारीमध्ये चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे. शाहरुखचा हा चित्रपट देशत २०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी वेगाने पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

डंकीच्या रिलीजनंतर ‘मन्नत’बाहेर गर्दी, किंग खानची फॅन्ससाठी खास सिग्नेचर पोज

प्रभासचा ‘सालार’ डंकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला. सालार २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून बंपर कमाई करत आहे. ‘सालार’च्या तुलनेत डंकीची कमाई संथ होती पण चित्रपटाचे कलेक्शन तितकेसे वाईट नव्हते. पण आता चित्रपटाला नवीन वर्षाचा लाभ मिळ्याल्याचे दिसते. चित्रपटाने वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी किती कमाई केली ते जाणून घेऊ.

हा चित्रपट रिलीज होण्याआधीच ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या कमाईचा आकडा ओलांडणार असे बोलले जात होते, मात्र तसे झाले नाही. त्याची ओपनिंग सर्वात कमी २९.२ कोटी झाली, आता या सिनेमाची कमाई भारतात २०० कोटींच्या जवळ पोहोचली आहे. sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने २०२४ च्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ व्या दिवशी दुसऱ्या सोमवारी ९.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण १२ दिवसांत चित्रपटाने १९६.९७ कोटींची कमाई केली आहे.

डंकीने जगभरात ३८० कोटींची कमाई

डंकीच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास ३८० कोटींचा गल्ला गाठला आहे. या चित्रपटाने ११ दिवसांत ३७०.२५ कोटी रुपये कमावले आहेत, तर ११ दिवसांत केवळ विदेशात १४५.०० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने इतक्या दिवसात २२५.२५ कोटी रुपयांचे कमाई केली आहे.

शिव ठाकरेने करुन दाखवलं! आधी ३० लाखांची कार आणि आता मुंबईत हक्काचं घर
शाहरुखचा डंकी कमाईच्या बाबतीत दहाव्या क्रमांकावर

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाची एकूण व्याप्ती ३०.८१% होती. संध्याकाळच्या शोमध्ये सर्वाधिक ४६.२६ % लोकांनी हा सिनेमा पाहिला. जवळपास १२० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आता ४०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. IMDB च्या रिपोर्टनुसार, शाहरुखचा हा चित्रपट २०२३ च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. हा शाहरुखचा गेल्या वर्षातील तिसरा हिट चित्रपट आहे.

लेकीच्या लग्नासाठी लखलखले आमिरचे घर, आयरा खान मराठमोळी सून होण्यास सज्ज
शाहरुखच्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नूची भूमिका

या चित्रपटात शाहरुखने पहिल्यांदाच राजकुमार हिराणीसोबत काम केले. चित्रपटात शाहरुखशिवाय विकी कौशल, तापसी पन्नू आणि सुनील ग्रोव्हर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.