Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशीचे व्रत करावे
संततीसुख मिळण्यासाठी एकादशीचे व्रत करायला सुरू करा. हे व्रत केल्याने लवकरच तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद लाभेल आणि तुम्हाला संततीसुख प्राप्ती होईल. प्रत्येक एकादशीला व्रत केल्यानंतर अन्न आणि वस्त्र यांचे दान करावे आणि मगच व्रत सोडावे. हा उपाय केल्याने तुमच्या घरी लवकरच गुड न्यूज येईल.
रुईच्या मुळाचा उपाय
ज्योतिष शास्त्रात रुईचा संबंध ग्रहांचा राजा सूर्याशी आहे आणि सूर्य हा जीवनाचा कारक मानला गेला आहे. शुक्रवारी रुईची मुळे एका लाल कापडात बांधून ते कंबरेला बांधावे. हा उपाय कोणालाही न सांगता, आणि कोणीही पाहाणार नाही, अशा प्रकारे करावा. या उपायाच्या मदतीने लवकरच तुमचे अंगण आनंदाने भरून जाईल.
रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे
संतती सुख मिळण्यासाठी नवीन वर्षी प्रत्येक रविवारी हा उपाय करायला सुरुवात करावी. प्रत्येक रविवारी तांब्याच्या पात्रात लाल चंदन टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच आईवडील बनण्याचे सुख मिळेल. तसेच रविवारी गरजवंताला एक वेळचे जेवण आवश्य द्यावे.
पिंपळाच्या झाडाचा उपाय
पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या उपायाने देवता आणि पितृगणही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला संततीसुखासाठी आशीर्वाद देतील. हा उपाय कमीतकमी ११ शनिवार केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल.
शुक्रवारी हा उपाय करा
नवीन वर्षात प्रत्येक शुक्रवारी कमीतकमी ५ कन्यांना खीर द्यावी. या कन्यांना तुमच्या घरी बोलवा आणि श्री लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करून या कन्यांना खीर खायला द्यावी. असे केल्याने तुमच्या घरी समृद्धी येईल आणि तुम्हाला संततीसुखाची प्राप्ती होईल.