Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 23 डिसेंबर 2023: मार्गशीर्ष एकादशी तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

4
राष्ट्रीय मिति पौष ०२, शक संवत १९४५, मार्गशीर्ष शुक्ल,द्वादशी, शनिवार, विक्रम संवत २०२८ सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ०८, जमादि-उल्सानी-०९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २३ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋतू. राहू काळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत द्वादशी त्यानंतर त्रयोदशी तिथीचा प्रारंभ. भरणी नक्षत्र रात्री ०९ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कृत्तिका नक्षत्र प्रारंभ.सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी शिवयोग त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, बव करण सायंकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०९
  • सूर्यास्त: सायं. ६-०६
  • चंद्रोदय: दुपारी ३-०२
  • चंद्रास्त: पहाटे ३-२८
  • पूर्ण भरती: सकाळी ८-१९ पाण्याची उंची ३.६५ मीटर, रात्री १०-०७ पाण्याची उंची ४.१९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-४३ पाण्याची उंची २.२० मीटर, दुपारी ३-०९ पाण्याची उंची ०.८८ मीटर.
  • दिनविशेष: मोक्षदा भागवत एकादशी, करिदिन.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १२ मिनिटांपासून ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २ि७ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ८ वाजून २७ मिनिटे ते ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ. दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटे ते ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ७ वाजून ५२ मिनिटांपासून ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत. भद्रकाळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय: पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करुन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.