Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आमिर खानची मुलगी आणि जावई यांचे झाले आहे एवढे शिक्षण; आयरा आणि नुपूर आहेत या विषयातील पदवीधर

9

Ira Khan And Nupur Shikhare Education: आमिर खानची मुलगी आयरा आणि जावई नुपूर शिखरे सध्या चर्चेत आहेत. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजीकोर्ट मॅरेज करत विविहबंधनात अडकले. अवघ्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह सोहळा नेटकर्‍यांसाठी चर्चेचा विषय ठरला.

(फोटो सौजन्य – योगेन शाह)

या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा आणि जावई यांचे शिक्षण किती..? हे दोघे काय करतात..? किती कमावतात…? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर जाणून घेऊया या अनेक प्रश्नांची उत्तरे…

मुंबईच्या सर्वात महागड्या शाळेतून शिक्षण :

आयरा खान ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. आयराने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर, आयरा ग्रॅज्युएशनसाठी नेदरलँडला गेली, तिथून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

DAIS Fees : अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी वाचून व्हाल अवाक्, सामान्यांच्या १ घराइतका महिन्याला होतोय खर्च
आयरा ही एक मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत :

एक स्टार किड असूनही, आयराने चित्रपटसृष्टीत करिअर करण्याऐवजी मानसिक आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. आयरचे हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवादी ठरले. तिच्या या निर्णयाचे अनेक स्तरांमधून कौतुक झाले असून, तिला अनेक वेळा सन्मानित करण्यात आले. ती केवळ २७ वर्षांची आहे, परंतु या वयात आयराने स्वतःचे नाव कमावले आहे आणि खूप काम केले आहे. आयरा ही मानसिक आरोग्य आणि निरोगीपणासाठी समर्पित एका संस्था ‘अगस्तू (Agatsu)’ ची संस्थापक आणि CEO म्हणून काम करते.

नुपूर इंडस्ट्रीमध्ये फिटनेस ट्रेनर :

आमिरची जावई नुपूर शिखरेचा जन्म पुण्यात झाला. त्याने मुंबईतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुपूरने आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Education

नुपूर किती कमावतो…?

नुपूर एक फिटनेस कोच आणि सल्लागार देखील आहे. हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. रिपोर्टनुसार, नुपूर शिखरेची एकूण संपत्ती सुमारे १० दशलक्ष डॉलर्स आहे. आमिर खानसोबतच नुपूर अनेक वर्षांपासून सुष्मिता सेनचा पर्सनल ट्रेनर आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.