Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रस्ते अपघातांमध्ये घट; परिवहन विभागाची माहिती, कोणत्या भागांत सर्वांत कमी प्रमाण?

9

मुंबई : रस्ते अपघात नियंत्रासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून त्या अंतर्गत वाहतूक सुरक्षेचे काम सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यात मुंबई, नवी मुंबई आणि चंद्रपूर या ठिकाणच्या अपघात आणि मृत्यूंमध्ये सर्वाधिक घट झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये २३ टक्यांनी, नवी मुंबईतील अपघातीमृत्यूंमध्ये १७ टक्क्यांनी; तर चंद्रपूरमध्ये १९ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती परिवहन आयुक्तालयाने दिली आहे.

यंदाच्या वर्षापासून रस्ता सुरक्षा सप्ताहाऐवजी महिना साजरा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी सुरक्षा महिन्याचे उद्घाटन झाले. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. राज्यातील जिल्ह्यांमध्ये अपमृत्यू रोखण्याची सर्वाधिक प्रभावी कामगिरी करणाऱ्या मुंबई शहर-उपनगर, नंदुरबार आणि नवी मुंबईतील जिल्हा समितीचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेसह नागरिकांनीही सहभाग घ्यावा,’ असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी केले.

यावेळी रस्ते अपघातात जखमींना मदत करणाऱ्या गुरुनाथ साठिलकर (खोपोली), विजय भोसले (खोपोली), हनिफ कर्जीकर (खालापूर), शशिकांत गजबे (पोलिस शिपाई, वर्धा) आणि प्रसन्ना पवार (मोटार वाहन निरीक्षक, कराड आरटीओ) या पाच प्रातिनिधिक जीवनदूतांचा सत्कार केला.

रस्ते अपघातांत दीड टक्के घट
वर्ष – अपघातांची संख्या – अपघाती मृत्यू

२०२२ – ३३,३८३ – १५,२२४
२०२३ – ३४,११४ – १५,००९
चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या
राज्यातील रस्ते अपघात नियंत्रणातील पहिले तीन जिल्हे
वर्षे – २०२२ – २०२३
जिल्हे – अपघातांची संख्या – मृत्यू – अपघातांची संख्या – मृत्यू – घट (टक्के)
मुंबई शहर-उपनगर – १,८९५ – ३७१ – १,४७३ – २८३ – २३.७०
चंद्रपूर – ८४० – ४३४ – ७९१ – ३४९ – १९.६०
नवी मुंबई – ७२७ – २९३ – ७५५ – २४१ – १७.७०

मालवाहतुकीला शिस्त हवी

मालवाहतूकदारांनी त्यांची वाहने उजव्या मार्गिकेवरून चालवायला हवी, यासाठी आरटीओने प्रयत्न करावे. वाचता न येणाऱ्या चालकांसाठी रंगाच्या मदतीने प्रबोधन करावे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यायला हवी. समृद्धीवर नवउद्योजकांसह नागरी सुविधा उभारायला हव्या.- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.