Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 1 मार्च 2024: मेष, वृषभ सह या राशींना आर्थिक लाभ, शत्रू पक्षावर विजय ! पाहा राशिभविष्य

7

मेष आर्थिक राशिभविष्य : कामात उत्तम यश

मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल, तसेच प्रत्येक कामात उत्तम यश मिळेल. तुम्ही लोकांत प्रिय व्हाल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात विशेष आकर्षण निर्माण होईल. वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला कार्यालयात सन्मानित केले जाईल. सायंकाळी प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. सायंकाळी आईला काही शारीरिक त्रास होऊ शकतात. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती सामान्य होईल.
PC:freepik.com

वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यापारात लाभ

वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यापारात लाभ

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि धन, सन्मानात वृद्धी होईल. तुम्ही कोणत्याही विषयात आज निर्भयपणे निर्णय घ्याल. तुम्ही तुमची कामे धाडसाने पूर्ण करण्यात सक्षम असाल. जोडीदारासोबत मधुर संबंध राहतील. चांगल्या वाहनातून प्रवास होईल आणि व्यापारात लाभ होईल.
PC:freepik.com

मिथुन आर्थिक राशिभविष्य : सावध राहून काम करा

मिथुन आर्थिक राशिभविष्य : सावध राहून काम करा

मिथुन राशीच्या लोकांना आज पूर्ण दिवस अतिशय सावध राहून काम करावे लागणार आहे. तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही, याची दक्षता घ्या. कोणत्याही औपचारिकतेत गुंतून न पडता तुम्हाला मन लावून काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. अडकलेले पैसे आज हाती येतील. विवेकबुद्धीने केलेली कामे लाभदायक ठरतील आणि तुमच्या सन्मानात वृद्धी होईल. सायंकाळी मंगलकार्यात भाग ठेवा.
PC:freepik.com

कर्क आर्थिक राशिभविष्य : कामे यशस्वी होतील

कर्क आर्थिक राशिभविष्य : कामे यशस्वी होतील

कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल, पण एखाद्या विषयात सहकाऱ्यांकडून निराशा होईल. तुमच्या कामाबद्दल गंभीर राहा. कठोर मेहनतीने केलेली कामे यशस्वी होतील. भौतिक साधनसुविधांवर खर्च होईल. शत्रू त्यांचा षडयंत्रात अयशस्वी होतील. तुमचा स्वभाव प्रसन्नचित्त असल्याने इतर लोक तुमच्याशी मैत्री करतील. रात्री एखाद्या व्यक्तीशी भेट होईल.
PC:freepik.com

सिंह आर्थिक राशिभविष्य : परोपकाराची भावना वाढेल

सिंह आर्थिक राशिभविष्य : परोपकाराची भावना वाढेल

सिंह राशीच्या लोकांना आज लाभाचा दिवस आहे आणि तुमच्यात आज परोपकाराची भावना वाढेल. आज तुमचा बराच वेळ धार्मिक कार्यात जाईल. आत्मविश्वासाने केलेल्या कामा यश मिळेल. जुनी रखडलेली कामे थोडा पैसा खर्च केल्याने मार्गी लागतील. नवीन योजनांवर आज काम सुरू होइल. तुमचा पराक्रम पाहून शत्रूही खुश होतील.
PC:freepik.com

कन्या आर्थिक राशिभविष्य : बोलण्यावर संयम ठेवा

कन्या आर्थिक राशिभविष्य : बोलण्यावर संयम ठेवा

कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कामे यशस्वी होतील आणि पैशांच्या बाबतीत यश मिळेल. संततीकडून शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबाकडून तुम्हाला प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. बोलण्यावर संयम ठेवला तर प्रत्येक कार्यात लाभ होईल. प्रत्येक बाबतीत विजय आणि यश प्राप्त कराल.
PC:freepik.com

तूळ आर्थिक राशिभविष्य : नवीन काम शिकाल

तूळ आर्थिक राशिभविष्य : नवीन काम शिकाल

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. जर एखाद्या कामावर तुम्ही कष्ट घेत असला तर त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना लाभ होईल. शिक्षण, स्पर्धापरीक्षा या क्षेत्रात तुमच्या दिशेत परिवर्तन होईल. शिक्षणात रुची वाढेल आणि तुमचा मानसन्मान वाढेल. नवीन काम शिकण्यात यशस्वी व्हाल, तुमच्या बोलण्याने इतर लोक प्रसन्न होतील.
PC:freepik.com

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : शत्रू पक्षावर विजय मिळवाल

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : शत्रू पक्षावर विजय मिळवाल

वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र जाईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतील. संततीच्या कामामुळे तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्हाला लाभ होईल. तुम्ही तुमचा संयम आणि प्रतिभा यामुळे शत्रू पक्षावर विजय मिळवाल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रिय व्यक्ती भेटतील. दिवस भटकंती आणि मौजमजेत जाईल.
PC:freepik.com

धनू आर्थिक राशिभविष्य : धार्मिक अनुष्ठानांत वृद्धी

धनू आर्थिक राशिभविष्य : धार्मिक अनुष्ठानांत वृद्धी

धून राशीच्या लोकांना आज लाभ होईल. आजच्या दिवशी विद्या, बुद्धी आणि ज्ञानप्राप्ती होईल. कठीण कामांतही इच्छापूर्ती होईल. सरकारकडून तुमचा सन्मान होण्याचे प्रबळ संकेत आहेत. सायंकाळी धार्मिक अनुष्ठानांत वेळ व्यतित कराल. शुभ कामात खर्च आणि कीर्तीत वृद्धी होईल.
PC:freepik.com

मकर आर्थिक राशिभविष्य : मन प्रसन्न राहील

मकर आर्थिक राशिभविष्य : मन प्रसन्न राहील

मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला पूर्वजांचे धन मिळण्याची शक्यता आहे. आझ तुम्ही धार्मिक कार्यात भाग घ्याल. न विचारता कोणालाही सल्ला देऊ नका, त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. रात्रीच्या वेळी पूर्ण कार्यात भाग घ्याल, त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहील. सायंकाळी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल.
PC:freepik.com

कुंभ आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धी होईल

कुंभ आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धी होईल

कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत यश मिळेल आणि भाग्य साथ देईल. उत्पन्न चांगले राहील आणि तुमच्या धनसंचयात वृद्धी होईल. भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. तुम्हाला मित्रांचे सहकार्य लाभेला आणि नवे मित्र मिळतील. धनवृद्धी होईल.
PC:freepik.com

मीन आर्थिक राशिभविष्य : रागावर नियंत्रण ठेवा

मीन आर्थिक राशिभविष्य : रागावर नियंत्रण ठेवा

मीन राशीच्या लोकांना दिवस शुभ आहे. तुमच्या संपत्तीत वृद्धी होईल. आईकडील नातेवाईकांच्या बाजूने तुम्हाला मानसन्मान मिळेल. तुम्हाला पत्नी तसेच पत्नीच्या नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत गुप्तशत्रू चहाडी करतील त्यामुळे सायंकाळी त्रास होईल. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही वादात पडू नका. तुमचे काम प्रमाणिकपणे पूर्ण करा.
PC:freepik.com

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.