Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे वाद?
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, Google त्याच्या ‘Google Play Store’ वर ॲप लिस्ट करण्यासाठी पैसे आकारते. म्हणजे, जर तुम्ही मोबाइल ॲप तयार केले असेल, तर ते Google Play Store वर लिस्ट करावे लागेल, जिथून प्रत्येक स्मार्टफोन युजर ते ॲप डाउनलोड करू शकेल. यासाठी गुगल संबंधित ॲपकडून पैसे घेते. हे शुल्क बदलते. यावरून वाद सुरू आहे. हे शुल्क सध्या 15 ते 30 टक्क्यांपर्यंत आहे.
Google बिलिंग सिस्टम म्हणजे काय?
गुगलने नवीन बिलिंग सिस्टीम आणली होती, जी कमाई करणाऱ्या ॲप्सवर लागू केली जाते. समजा, ‘Shaadi.com’ एक ॲप आहे. हे ॲप सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. याचा अर्थ, जर तुम्ही ‘Shaadi.com’ चे पेड सबस्क्रिप्शन घेतले तर ‘Shaadi.com’ च्या मालकाला त्याचा फायदा होईल, परंतु या फायद्यातील सुमारे 15 ते 30 टक्के गुगलला द्यावे लागतील.
सरकारला करावा लागला हस्तक्षेप
1 मार्च रोजी Google ने ‘Google Play Store’ वरून अनेक ॲप्स काढून टाकले. याचे कारण गुगल बिलिंग सिस्टीम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गुगलच्या या कारवाईबाबत सरकार कडक झाले. यानंतर ॲप्स परत आले आहेत. आपण पुर्णपणे भारतीय स्टार्टअप्ससोबत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Google Play store ची व्याप्ती मोठी
गुगलची व्याप्ती फक्त गुगल सर्चपुरतीच मर्यादित नाही. Google ची स्वतःची संपूर्ण इकोसिस्टम आहे. उत्पादन व सेवांकडे त्यांच्या डिजिटल मार्केटिंगसाठी सध्या तरी त्या तोडीचा दुसरा सक्षम ऑप्शन उपलब्ध नाही. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल तर याचा अर्थ तुम्ही प्रत्येक प्रकारे Google वर अवलंबून आहात. अँड्रॉइड ही गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी ‘ॲपल’ वगळता सर्व स्मार्टफोन कंपन्या वापरतात. यामुळेच तुम्हाला प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये ‘Google play store’ ॲप दिसेल. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही फोनवर एखादे ॲप डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची मदत घ्यावी लागेल. म्हणजेच गुगल हे एक प्रकारे स्मार्टफोन युजर आणि ॲप यांच्यातील प्रवेशद्वार आहे. याशिवाय जीमेल, गुगल मॅप यांसह अनेक गुगल ॲप्स आहेत ज्यांचा गुगलला फायदा होतो.
काय आहे गुगलला पर्याय
अशावेळी गुगलशिवाय दुसरा पर्याय नाही का, असा प्रश्न पडतो. बाजारात सॅमसंग सोबत ‘PhonePe’ चे ‘Indus App Store’ आहे, जिथे तुम्ही तुमच्या ॲपची मोफत लिस्टिंग करू शकता. परंतु , गुगल खूप लोकप्रिय आहे. आजकाल, प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google Play Store प्री-इंस्टॉल केलेले असते. अशा परिस्थितीत ॲप बनवणारे स्टार्टअप केवळ लोकप्रिय प्लॅटफॉर्मकडे वळतात. तसेच, Google ची स्वतःची इकोसिस्टम आहे, ज्यामुळे ॲप निर्मात्यांना फायदा होतो.