Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vivo V30 ची किंमत आणि उपलब्धता
भारतीय बाजारात Vivo V30 स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे. डिवाइसच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेजची किंमत ३३,९९९ रुपये आहे. मोबाइलच्या ८जीबी रॅम व २५६ जीबी मॉडेलची किंमत ३५,९९९ रुपये आहे. टॉप मॉडेल १२जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजसह ३७,९९९ रुपयांमध्ये विकला जाईल. हा डिवाइस Andaman Blue, Peacock Green आणि Classic Black अश्या तीन कलरमध्ये मिळेल. सीरीजची प्री बुकिंग आज पासून सुरु करण्यात आली आहे, तर डिवाइसची विक्री येत्या १४ मार्चपासून फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाइट आणि अन्य आउटलेट्सवर सुरु केली जाईल.
हे देखील वाचा:
Vivo V30 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V30 चे स्पेसिफिकेशन पाहता ब्रँडनं यात ६.७८ इंचाचा मोठा एचडी प्लस अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्क्रीनवर युजर्सना २८०० x १२६० पिक्सल रिजॉल्यूशन, एचडीआर १० प्लस, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २८००निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो.
फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटसह हीटिंग इश्यू येऊ नये म्हणून अल्ट्रा स्मार्ट कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे. मोबाइलमध्ये युजर्सना १२जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर डिव्हाइसमध्ये १२जीबी पर्यंत रॅम एक्सपांशन देखील मिळतं, ज्याच्या मदतीनं २४जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट घेता येईल.
कॅमेरा फीचर्स पाहता Vivo V30 5G डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सपोर्ट आणि आणि ऑरा लाइट फीचरसह आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग पाहता युजर्सना ५० मेगापिक्सलचा AF आणि AI टेक्नॉलॉजी असलेला फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.
फोनला पावर देण्यासाठी Vivo V30 मध्ये ब्रँडनं ५०००एमएचची मोठी बॅटरी दिली आहे. ही फास्ट चार्ज करण्यासाठी ८०वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे काही मिनिटांत फोन फुल चार्ज होतो. Vivo V30 ची ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित फन टच ओएस १४ वर चालतो.