Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चुकूनही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘हे’ 5 मेसेज पाठवू नका; अडकू शकता कायद्याच्या कचाट्यात

11

आपल्यापैकी बरेच जण शाळा, कॉलेज, सोसायटी यांसारख्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपचे मेम्बर असतात. बऱ्याचदा आपण अशा ग्रुपवर अनेक मेसेजेस पोरवर्ड करत असतो. मात्र असे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्यातील कन्टेन्ट समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही पाठवलेल्या कंटेन्टवर ग्रुपमधील एखाद्या मेम्बरला आक्षेप असण्याची शक्यता असू शकते. निष्काळजीपणे व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी या विशेष प्रकारच्या कन्टेन्टबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे.

ॲडल्ट कन्टेन्ट

जर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲडल्ट कंटेंट शेअर करत असाल, तर ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला यात काही अडचण आल्यास तो त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करू शकतो आणि तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि आवश्यक कलमांतर्गत या प्रकरणी कारवाईही होऊ शकते.

ॲण्टी नॅशनल

जर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपवर असा कोणताही मजकूर किंवा व्हिडिओ शेअर केला असेल ज्यामध्ये देशविरोधी गोष्टी बोलल्या जात असतील तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर गटातील कोणत्याही सदस्याला तुमचा मजकूर किंवा तुम्ही लिहिलेले शब्द आवडले नाहीत आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

बाल गुन्हेगारी संबंधित मजकूर

जर तुम्ही बालगुन्हेगारीशी संबंधित कोणताही मजकूर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर केला असेल ज्यामध्ये कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा मजकूरअसेल आणि कोणी त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असेल तर तुम्हाला थेट तुरुंगात पाठवले जाईल.

हिंसाचाराशी संबांधित कन्टेन्ट

जर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हिंसाचाराशी संबंधित कोणताही मजकूर शेअर केला असेल ज्यामध्ये हिंसेशी संबंधित असा कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा असा कोणताही मजकूर असेल आणि त्यामुळे जर ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला कोणतीही समस्या येत असेल तर तो तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो.

एमएमएस

जर कोणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एमएमएस पाठवत असेल आणि तुम्ही तो तुमच्या कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला असेल तर तुम्ही तसे करू नये. ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला हे आवडले नाही आणि त्याने त्यासंदर्भात तक्रार केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

व्हॉट्सॲपचे नियमन किंवा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा सरकारचा विचार

त्रासदायक कॉल्स आणि मेसेजच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी सरकार व्हॉट्सॲप सारख्या ओव्हर-द-टॉप चॅनेलचे नियमन किंवा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा विचार करत आहे, ग्राहक व्यवहार मंत्रालय (DoCA) या विषयावरील चर्चेचे नेतृत्व करत आहे.
यासंदर्भात मागील महिन्यात झालेल्या बैठकीत विशेषत: ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर कसा करत आहेत यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. त्रासदायक कॉलचे नियमन आणि तपासणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला आहे. या बैठकीला दूरसंचार विभाग, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI), दूरसंचार उद्योग संस्था COAΙ आणि Reliance Jio, Vodafone Idea आणि Bharti Airtel या दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.