Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ९१५ रुपयांमध्ये 150W सुपरफास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 3 फोन, अशी आहे ऑफर

7

जर तुम्ही तासंतास फोन चार्जिंगवर लावण्याचा तुम्हाला कंटाळा आलाय का? तर तुमच्यासाठी 150W फास्ट चार्जिंग असलेला रियलमी जीटी नियो ३ फोन परफेक्ट ठरेल. हा फोन काही मिनिटांत फुल चार्ज होतो. चला पाहूया फोनवर मिळत असलेली शानदार डील.

जर तुम्ही सुपरफास्ट चार्जिंग स्पीड असलेला फोन खरीदना खरेदी करू इच्छित असाल तर भारतीय बाजारात तुमच्यासाठी Realme GT Neo 3 (150W – Thor Limited Edition) चांगला ऑप्शन ठरू शकतो. Realme GT Neo 3 फोन 150W फास्ट चार्जिंग स्पीड सह येतो. हा फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला तासंतास वाट पाहावी लागणार नाही. हा फोन 150W सुपरफास्ट चार्जिंग स्पीडसह मिनिटांत फुल चार्ज होतो.

Realme GT Neo 3 ची किंमत आणि ऑफर

Realme GT Neo 3 फोनच्या १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर ४५,९९९ रुपये आहे. परंतु सध्या हा १७००० रुपये डिस्काउंटसह २५,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे.

Realme GT Neo 3 फोनवर फ्लिपकार्ट कंपनी धमाकेदार ऑफर देखील देत आहे. या ऑफर अंतगर्त तुम्ही फोन फक्त ९१५ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच, जुन्या फोनच्या एक्सचेंजवर २२,७०० रुपये पर्यंतचा ऑफ देखील मिळेल.

Realme GT Neo 3 चे फीचर्स

Realme GT Neo 3 फोनची बॅटरी ४५००एमएएचची आहे, जी 150W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा चार्जिंग स्पीडमुळे फोन ५ मिनिटांत ५० टक्के चार्ज करण्याची क्षमता आहे. तसेच १५ मिनिटांत फोन १०० टक्के चार्ज होतो. Realme GT Neo 3 चे अन्य फीचर्स पाहता, हा फोन ६.७ इंचाच्या Full HD+ डिस्प्लेसह येतो. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Mediatek Dimensity 8100 प्रोसेसर आहे.

Realme GT Neo 3 फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.