Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एप्रिल मासिक राशिभविष्य 2024 : एप्रिलमध्ये चर्तुग्रही योग, तूळ राशीसह 5 राशींचा भाग्योदय, जाणून घ्या राशिभविष्य

11

मेष – चिथावणीला बळी पडू नका

एप्रिल महिन्यात मेष राशीचे लोक त्यांच्या बोलण्यामुळे आणि वर्तणुकीमुळे काही मिळवू शकतात आणि काही गमावू शकतात, त्यामुळे कोणच्या चिथावणीला बळी पडून इतरांसोबत चुकीच वर्तन करू नका. जमीन, घर, कमिशन यामध्ये काम करणाऱ्यांना महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित लाभ होईल. जे लोक परदेशाशी संबंधित आहेत, त्यांनाही लाभ मिळेल. नोकरदार व्यक्तींचा कार्यस्थळी सन्मान वाढेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मित्राचा सहकार्याने उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. जमीन, घर खरेदी विक्रीतून लाभ होईल. सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना हा काळ शुभ राहील. या काळात युवकांचा अधिकाधिक वेळ मौजमजेत जाईल. या काळात नोकरदार व्यक्तींना त्याच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात सरकारी आणि राजकारणाशी संबंधित कामात अडथळे येतील. या काळात घरगुती त्रास वरचढ ठरू शकतात. प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ शुभ नाही. तुमची दैनंदिनी आणि खाणेपिणे यावर विशेष लक्ष ठेवा. या काळात गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि कोणत्याही मोठ्या व्यवसायात विचारपूर्वक पैसे लावा. प्रेमसंबंधाचा विचार करता हा महिना सामान्य राहील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. कुटुंबासोबत मौजमजा करण्याच्या अनेक संधी मिळतील.

वृषभ – करिअर आणि व्यापारात प्रगतीच्या संधी

वृषभ - करिअर आणि व्यापारात प्रगतीच्या संधी

एप्रील महिन्याची सुरुवातीला वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यापारात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभाचे योग आहेत. शुभचिंतकांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील आणि अप्रत्यक्ष लाभ होतील. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने आर्थिक लाभ तर होईलच शिवाय सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. प्रवास शुभ आणि लाभदायक सिद्ध होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण झाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. महिन्याच्या मध्यावर एखादी वाईट वार्ता तुम्हाला अस्वस्थ करू शकेल. या काळात जवळच्या लाभासाठी दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. संयम आणि धाडसाने आव्हानांना तोंड द्यावा. वाहन चालवताना सावध राहा, अपघात होण्याची शक्यता आहे. या काळात वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, या कारणामुळे मानसिक अशांतता राहील. पण महिन्याच्या उत्तरार्धात सर्व मतभेद आणि गैरसमज दूर होतील. लव्ह पार्टनरसोबत नात्यात दृढता येईल. तुमच्या कठीण काळात लव्ह पार्टनर तुमच्या बाजूने उभा राहील. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही चिंतेत असाल.

मिथुन – संततीकडून शुभवार्ता मिळेल

मिथुन - संततीकडून शुभवार्ता मिळेल

मिथुन राशीला एप्रिल महिन्याच्या पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा चांगला जाईल. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित अशी प्रगती दिसून येईल. कार्यस्थळी तुम्हाला वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. तसेच तुमच्या इच्छेनुसार पदोन्नती आणि बदलीच्या शक्यता ही आहेत. व्यापारानिमित्त केलेले प्रवास शुभ ठरतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि संततीकडून तुम्हाला शुभवार्ता मिळेल. सामाजिक आणि राजकीय घडामोडींत भाग घेण्याची संधी मिळेल. महिन्याच्या मध्यावर नशिब तुमची साथ देईल. तुम्ही विचार केलेली कामे पूर्ण होतील आणि चैनीच्या संबंधित वस्तूंवर पैसे खर्च होतील. या काळात तुम्हाला कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित करण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ राहील. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात प्रयत्न करावेत. जे लोक पूर्वापासून प्रेमसंबंधात आहेत त्यांना लव्ह पार्टनरसोबत क्षण व्यतित करण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवनात माधुरता राहील. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती काहीशी आव्हानात्मक राहील, या काळात तुम्ही विरोधकांपासून सावध राहिले पाहिजे.

कर्क – वैवाहिक जीवनात माधुर्य राहील

कर्क - वैवाहिक जीवनात माधुर्य राहील

कर्क राशीच्या लोकांना एप्रिल महिना संमिश्र सिद्ध होईल. महिन्याच्या सुरुवातीला तुमची भाषा आणि व्यवहार यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. व्यावसायिक हालचाली संथ होतील. व्यवसायच्या दृष्टीने सतर्क राहावे लागेल. फक्त व्यवसायच नाही तर करिअरबद्दलही सतर्क राहा आणि कोणताही बेजाबदारपणा करू नका. एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. या काळात सट्टेबाजी, शेअर बाजार यापासू दूर राहा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. महिन्याच्या मध्याला कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक तंगी दूर होईल आणि जमीन, घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात तुम्हाला मनासारखा लाभ होईल. या काळात प्रेमसंबंधात सावधतेने पुढे गेले पाहिजे. लव्ह पार्टनरवर कुरघोडी करण्यापेक्षा त्याच्या भावना समजून घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या कडूगोड तक्रारी राहतील, पण वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.

सिंह – विवेकबुद्धीने काम करा

सिंह - विवेकबुद्धीने काम करा

एप्रिल महिना सिंह राशीचा लोकांसाठी शुभता आणि सौभाग्य घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्रांच्या मदतीने करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या संधी मिळतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात रुची वाढेल. शिक्षण आणि कन्सल्टिंगमध्ये असलेल्या लोकांना या काळात विशेष लाभ होईल. सरकार आणि सत्तेचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोर्ट कचेरीशी संबंधित विषयात पूर्ण यश मिळेल. कामाशी संबंधित केलेले प्रवास लाभाचे ठरतील. प्रवासातून निर्माण झालेले संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील. महिन्याच्या मध्याला तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्टीने कमकुवत राहाल, पण हा काळ तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात घरी एखादे शुभ कार्य आयोजित होईल. प्रेमसंबंधात आपापसांतील विश्वास आणि लव्ह पार्टनर सोबत जवळीक वाढेल. आईवडील तुमच्या प्रेमसंबंधाना सहमती देतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदारासोबत तीर्थयात्रेवर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. महिन्याचा उत्तरार्धात तुमच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. या काळात तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च होणार नाहीत, हे पाहा. अन्यथा तुम्हाला पैसे उधार घेण्याची वेळ येईल. कोणाच्या चिथावणीला बळी पडू नका. तुम्ही विवेक बुद्धीने काम करू शकला तर तुमची यशाची शक्यता वाढेल.

कन्या – संकटांना धैर्याने तोंड द्या

कन्या - संकटांना धैर्याने तोंड द्या

कन्या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काही प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागेल. पण या प्रतिकूल परिस्थितींना तोंड देताना स्वतःवरील संयम गमावून नका, अन्यथा तुम्हाला जास्त समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. घरातील असोत किंवा बाहेरच्या संकटांना धैर्याने तोंड द्या, कारण या समस्या दीर्घकाळ टिकणाऱ्या नाहीत. महिन्याच्या दुसऱ्या भागात तुम्ही जवळच्या लोकांच्या मदतीने आणि स्वतःच्या विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. महिन्याच्या मध्याला तुमचे मन कठीण परिस्थितीत शांतता आणि एकांताचा शोध घेईल. या काळात व्यवसायाशी संबंधित निर्णय विचापूर्वक घ्या. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल, पण या कठीण काळात जवळचे मित्र आणि लव्हपार्टनर सोबत राहतील, त्यामुळे दिलासा मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. लव्ह पार्टनर सोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे मन चिंतेत असेल. महिन्याच्या उत्तरार्धात जुन्या मित्रांची भेट होईल, त्यामुळे भविष्यात लाभ होईल.

तूळ – कोर्टकचेरीत मनासारखे यश

तूळ - कोर्टकचेरीत मनासारखे यश

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस फार सुखद आणि लाभकारक राहील. एप्रिल
महिन्याच्या सुरुवातीला जे लोक रोजगाराच्या दिशेत काम करत आहेत, त्यांना मनासारखे यश मिळेल. नोकरदार व्यक्तींना या महिन्यात नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचे भरपूर सहकार्य मिळेल. कोर्टकचेरीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येतील. करिअर, किंवा व्यापाराच्या अनुषंगाने तुम्ही काही दिवसांपासून प्रवासाचे नियोजन करत असाल तर या महिन्याच्या मध्यापर्यंत प्रवास घडून येईल. महिनच्या मध्याला एखाद्या विशेष व्यक्तीच्या सहकार्याने एखादी मोठी समस्या मिटेल. तुमच्या मुलांचे यश तुमच्या सन्मानाचे कारण बनेल. महिनच्या उत्तरार्धात तुम्हाला लव्ह पार्टनरकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधात नवीन ऊर्जेचा अनुभव घ्याल. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवासाला जाल.

वृश्चिक – प्रगतीची चांगली संधी मिळेल

वृश्चिक - प्रगतीची चांगली संधी मिळेल

एप्रिल महिन्याची सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांना शुभता आणि यश घेऊन येईल. पण उत्तरार्धात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाची प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा यांचे योग्य नियोजन करू शकलात तर तुम्हाला मनासारखे यश आवश्य मिळेल. महिन्याच्या मध्याला करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने उचलेले योग्य पाऊल तुमच्यासाठी चांगले भविष्य घडवतील. व्यापाराला पुढे घेऊन जाण्यात ही वेळ योग्य आणि शुभ सिद्ध होईल. या काळात तुमच्या लक्षात येईल की तुमची कामे हळूहळू पूर्ण होत आहेत, आणि तुम्हाला लाभाच्या नव्या संधी मिळतील. संततीकडून तुम्हाला काही शुभवार्ता मिळेल आणि त्यामुळे घरी आनंदाचे वातावरण राहील. महिनाच्या उत्तरार्धात तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहात असलेल्या एखाद्या चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. या काळात उत्पन्नापेक्षा खर्च थोडा जास्त होईल. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुम्हाला शुभ ठरेल. लव्ह पार्टनरसोबत सुखद क्षण व्यतित करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात निराशेचा सामना करावा लागेल. या काळात कोणच्या चिथावणीला बळी पडू नका. तुम्हाला तुमची दैनंदिनी आणि प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.

धनू – पैशांचे नियोजन करा

धनू - पैशांचे नियोजन करा

धनू राशीच्या जातकांना एप्रिल महिना अतिशय शुभ ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही कठोर मेहनत घेतली आणि करिअर, व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले तर तर नशिब तुमचे साथ देईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ तुमची प्रशंसा करतील. नोकरदार लोकांना व्यावसायिक जीवनात काही नवीन आणि चांगेल करण्याची संधी मिळेल. एकूण तुमची पदोन्नती होण्याची आणि मानसन्मान वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. महिन्याच्या अखेरीस शुभचिंतकांचे सहकार्य लाभेल आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. व्यापारात तुम्हाला मनासारखा लाभ होईल. कोर्टकचेरीची कामाता विरोधक कोर्टाबाहेर तोडगा काढण्यासाठी सहमत होऊ शकतात. महिन्याच्या मध्याला एखाद्या खास व्यक्तीशी ओळख होऊन, ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात होऊ शकते. जे आधीपासून प्रेमात आहेत, त्यांच्यात आपापसांतील विश्वास वाढू शकतो. या महिन्यात तुम्हाला लव्हपार्टनरसोबत चांगला वेळ व्यतित करण्याच्या संधी मिळतील. महिन्याच्या अखेरीस तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, तसेच तुम्हाला पैशांचे नियोजन करावे लागेल. अन्यथा तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते.

मकर – जोडीदाराच्या आरोग्याची चिंता

मकर - जोडीदाराच्या आरोग्याची चिंता

तुमच्यासाठी एप्रिल महिना संमिश्र ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कार्यक्षेत्रातील विरोधकांबद्दल फार सावध राहावे लागेल. तुमच्या योजना जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्याबद्दल कोणाशीही बोलू नका, अन्यथा तुमचे विरोधक यात अडचणी निर्माण करतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या मनात नसतानाही लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात तुमची प्रकृती आणि सामान या दोन्हींचे लक्ष ठेवा. कार्यस्थळी तुमचे जवळचे लोक तुमच्याकडे दुलर्क्ष करतील, त्यामुळे तुमच्या मनावर आघात होईल. या काळात कोणाच्या मताला महत्त्व न देता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर या काळात पैशाच्या देवाणघेवाणीत विशेष सावधर राहा. तसेच कोणत्याही मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञ किंवा शुभचिंतकांचा सल्ला घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे वाहन चालवताना सावध राहा. तसेच चोरी होण्याची शक्यता असल्याने तुमचे समान जपून ठेवा. जर तुम्ही एकादी जमीन किंवा जागा खेरदी किंवा विक्री करत असाल तर कागदोपत्री कारवाईकडे विशेष लक्ष द्या आणि विचापूर्वक सही करा. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पावले टाका आणि यासंबंधी मोठा निर्णय घेताना स्वतःच्या हिताचा विचार करा. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. पण जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता राहील

कुंभ – प्रयत्नांना यश येईल

कुंभ - प्रयत्नांना यश येईल

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या विशेष कामानिमित्त तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येईल. कामच्या ठिकाणी वरिष्ठी तुमची स्तुती करतील, पण या काळात तुम्हाला अतिआत्मविश्वासापासून दूर राहिले पाहिजे. अहंकार किंवा भावनेच्या भरात अशी कोणतीही जबाबदारी घेऊ नका, ज्याचा तुम्हाला भविष्यात त्रास होईल. या काळात तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असे कोणतेही वचन कोणला देऊ नका. व्यापाऱ्यांना बाजारात चढउताराला तोंड द्यावे लागेल. या काळात एक लहानशी चुक तुमच्यासाठी संकट ठरू शकते. या काळात तुमची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थितीला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम करू नका. महिन्याच्या अखेरीस लहानसहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. तुमचे प्रेमसंबंध जगजाहीर करू नका. या महिन्यात तुमच्या लव्हस्टोरीत एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे आगमन झाल्याने त्रासात भर पडेल. वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुलर्क्ष करू नका.

मीन – कामे वेळेत पूर्ण करा

मीन - कामे वेळेत पूर्ण करा

एप्रिल महिना मीन राशीच्या लोकांनी आजचे काम उद्यावर ढकलण्याची स्वतःची सवय सोडली पाहिजे. अन्यथा हाती येत असलेले यश ही निसटून जाईल. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यावी लागेल, जेणे करून तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला पूर्ण लक्ष तुमच्या कामावर दिले पाहिजे, तसेच अनाव्यक आकर्षणापासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर जोखीम असलेल्या गुंतवणुकीत पैसे लावू नका. राजकारणात एखादे जबाबदारीचे पद मिळण्याची प्रतीक्षा वाढू शकते. महिन्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या पैशांचे नियोजन नीट करावे लागणार आहे. स्वतःच्या खिशातून जास्त पैसे खर्च होणार नाहीत असे पाहा, अन्यथा तुम्हाला उधार पैसे घ्यावे लागतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पैशाशी संबंधित व्यवहारात फार सावध राहा, तसेच डोळे झाकून कोणावर विश्वास ठेऊ नका. या काळात सट्टेबाजी, शेअर्स यापासून दूर रहा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही सिंगल असाल तर विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाढेल. जर तुम्ही आधीपासून प्रेमसंबंधात असाल तर लव्हपार्टनरसोबत चांगले ताळमेळ दिसेल. वैवाहिक जीवनात मधुरता येईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.