Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आज QR कोड जनरेट करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. हि प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करून, तुम्ही तुमच्या फोनद्वारे कोणत्याही लिंकचा QR कोड सहजपणे जनरेट करू शकता. Android आणि डेस्कटॉपवर QR कोड जनरेट करण्याचा सोपा मार्ग येथे जाणून घेऊया.
Android वर कसा तयार करायचा QR कोड
- स्मार्टफोनद्वारे QR कोड जनरेट करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनमध्ये Chrome ब्राउझर ओपन करावे लागेल.
- यानंतर ज्याचा QR कोड तुम्हाला जनरेट करायचा आहे, त्या वेबसाइटची किंवा आर्टिकलची लिंक उघडा.
- आता त्या वेबसाइट आणि आर्टिकलच्या लिंकच्या पुढे दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
- यानंतर खाली स्क्रोल करा आणि शेअर ऑप्शन निवडा.
- यानंतर तुम्हाला खाली QR Code चा व ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर डाउनलोडवर क्लिक करा. आता तुमचा QR कोड डाउनलोड केला जाईल, जो तुम्ही कोणाशीही शेअर करू शकता.
डेस्कटॉपवर कसा तयार कराल QR कोड
- डेस्कटॉपद्वारे QR कोड जनरेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम Chrome ब्राउझर ओपन करावे लागेल.
- यानंतर, ज्या ब्राउझरसाठी तुम्हाला QR कोड जनरेट करायचा आहे त्यावर ती वेबसाइट आणि आर्टिकल उघडा.
- यानंतर या लिंकच्या पुढे दिसणाऱ्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला Save and Share ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला QR कोड जनरेट करण्याचा ऑप्शन मिळेल.