Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 7 एप्रिल 2024 : नवीन संपर्कातून लाभ, अडथळ्यांवर मात, या राशींसाठी ‘रविवार’ खास ! जाणून घ्या, राशिभविष्य

8

मेष – कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका

आज मेष राशीच्या लोकांना विचारपूर्वक कामे करावी लागतील. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, अजिबात निष्काळजीपणा करू नका, नाहीतर भविष्यात ती एखाद्या मोठ्या आजाराचे रूप धारण करू शकते. काही निराशाजनक माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला अचानक प्रवासाला निघावे लागू शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीची काळजी करत असाल तर ती काळजीही आज दूर होईल. तुम्ही कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या सोबत असेल. श्री गणेश चालिसाचे पठण करा.
PC:freepik.com

​वृषभ – कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करा​

​वृषभ – कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करा​

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. मित्रांसोबत काही मतभेद झाले असतील तर ते आज दूर होतील आणि तुमच्यातील जवळीक वाढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या तर तुम्ही त्या नक्कीच पूर्ण कराल. आपण एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाऊ शकता. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन सहज पूर्ण करू शका. तुम्ही कोणताही व्यवहार करताना तो अतिशय काळजीपूर्वक विचार करावा, नाहीतर कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतो.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या सोबत आहे. सफेद चंदनाचा टिळा लावा आणि शंभोशंकराला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा.
PC:freepik.com

मिथुन – जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल

मिथुन - जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आवश्यक फायदे घेऊन येणार आहे. तुम्ही जर तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. कोणत्याही कामात दिनचर्या सांभाळावी, तरच ते पूर्ण होईल. देण्याघेण्याच्या व्यवहारात स्पष्टता ठेवावी, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या आईवडिलांच्या सेवेत घालवाल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि सान्निध्य मिळत असल्याचे दिसते.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या सोबत असेल. गाईंना गूळ खाऊ घाला.
PC:freepik.com

कर्क – अडथळ्यांवर मात कराल

कर्क – अडथळ्यांवर मात कराल

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस असेल. तुमच्या एखाद्या कामात अडथळे येत असतील तर तुम्ही त्यावरही मात करून पुढे जाल आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला चांगले नाव कमावण्याची संधी मिळेल. आपण विविध परिस्थितींवर नियंत्रण ठेवल्यास ते आपल्यासाठी चांगले होईल. जे लोक नोकरीसोबत काही काम करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छाही पूर्ण होऊ शकते.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
PC:freepik.com

सिंह – घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगा

सिंह - घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगा

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायक असणार आहे. तुम्हाला तुमच्या काही घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही वादात पडू नका. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर त्याची स्थावर आणि जंगम बाजू स्वतंत्रपणे तपासा. तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या घरातील ताणतणाव निवळण्यासाठी हस्तक्षेप करू शकते, ज्यामुळे वातावरण शांततापूर्ण राहील. काही नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. तुमच्या मनातील एखादी इच्छा तुम्ही तुमच्या आई वडिलांसमोर व्यक्त करू शकता.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या सोबत असेल. बजरंग बाणाचे पठण करा.
PC:freepik.com

कन्या – करिअरशी संबंधित समस्या सुटतील

कन्या - करिअरशी संबंधित समस्या सुटतील

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक गुंतागुंतीने भरलेला असणार आहे. तुम्ही बंधुत्व वाढवण्यावर पूर्ण भर द्याल. अविवाहितांना मनाप्रमाणे वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर त्या देखील आज सोडवल्या जातील. तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होताना दिसत आहे.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा.
PC:freepik.com

तूळ – कुटुंबातील रुसवा – फुगवा दूर होईल

तूळ - कुटुंबातील रुसवा - फुगवा दूर होईल

तूळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेला जुना रुसवा – फुगवा दूर होईल. सर्व जण एकमेकांसोबत मौजमजेत वेळ घालवताना दिसतील. परस्पर संबंध अधिक दृढ होतील. काही महत्त्वाच्या विषयांवर वरिष्ठ सदस्यांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक आपले पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला बाहेरील लोकांपासून सावध राहावे लागेल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या सोबत असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
PC:freepik.com

वृश्चिक – महत्त्वाचे काम पूर्ण होईल

वृश्चिक – महत्त्वाचे काम पूर्ण होईल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच फलदायक ठरणार आहे. तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल आणि कुटुंबात एक छोटीशी पार्टीही आयोजित कराल. नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. कोणतेही काम सगळ्यात आधी करण्याच्या तुमच्या सवयीमुळे आज तुम्हाला चांगला फायदा मिळेल. परंतु जर तुम्ही एखाद्या मित्राकडून गुंतवणूक संबंधित योजनेबद्दल ऐकले असेल, तर तुम्हाला त्यात पैसे गुंतवणे टाळावे लागेल, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या सोबत असेल. श्री शिव चालिसाचे पठण करा.
PC:freepik.com

धनू – स्वभावात नम्रता ठेवा

धनू – स्वभावात नम्रता ठेवा

आज धनू राशीच्या मंडळींना परदेशात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. देण्याघेण्याच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. लोकांशी व्यवहार करताना सतर्क राहावे लागेल. नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला स्वभावात नम्रता ठेवावी लागेल, तरच तुम्ही लोकांकडून सहजतेने कामे करून घेऊ शकाल. जर तुम्ही एखाद्याला व्यवसायात भागीदार बनवण्याचा विचार करत असाल, तर त्याची संपूर्ण माहिती काढून घ्या. आज जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या सोबत असेल. प्रत्यक्ष देवता भगवान सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा.
PC:freepik.com

मकर – वरिष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा

मकर - वरिष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा

आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना काही गुंतागुंतीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा देखील आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी केलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. मुलाच्या करिअरची काही चिंता असेल तर ती दूर होईल. तुमची काही रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही व्यग्र असाल. तुम्ही स्वत:साठी एखादे ध्येय निश्चित केल्यास ते तुमच्यासाठी इष्ट राहील.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडात गुंडाळून अर्पण करा.
PC:freepik.com

कुंभ – खाण्यापिण्याच्या सवयी बदला

कुंभ - खाण्यापिण्याच्या सवयी बदला

कुंभ राशीच्या पद आणि प्रतिष्ठेत आजच्या दिवशी वाढ होईल. कोणत्याही सरकारी कामात तुम्हाला अत्यंत हुशारीने काम करावे लागेल. तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडून तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून शाबासकी मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागेल अन्यथा तुम्हाला तब्येतीच्या कुरबुरींना सामोरे जावे लागेल. पोटाशी संबंधित समस्या उद्भवून त्याचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. काही जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. गरिबांना वस्त्र आणि अन्न दान करा.
PC:freepik.com

मीन – नवीन संपर्कातून चांगले लाभ मिळतील

मीन - नवीन संपर्कातून चांगले लाभ मिळतील

मीन राशीच्या लोकांना आज काही नवीन संपर्कातून चांगले लाभ मिळतील आणि नशीब देखील पूर्ण साथ देईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना देखील बनवू शकता. आज तुम्हाला जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुमचा तुमच्या कामावर पूर्ण विश्वास असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळाल्याने तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा.
PC:freepik.com

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.