Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 13 एप्रिल 2024: या राशींनी कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा टेन्शन वाढेल ! पाहा, तुमचे राशिभविष्य
मेष आर्थिक राशिभविष्य : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे. पार्टटाईम कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील आणि तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला त्रासातून दिलासा मिळेल. हळूहळू नशिब तुमची साथ देईल. तुम्हाला आर्थिक कष्टातून मुक्ती मिळेल. आज काही कारणाने दूरचा प्रवास करावा लागू शकतो.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे पूर्ण होतील
वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक विषयात लाभ होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. घरी सुख-समृद्धी राहील आणि तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कुटुंबात एखाद्या शुभ, मंगलकार्याची चर्चा होऊ शकते. राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्हाला वर्तमानकाळात वापरात असलेल्या वस्तू विकत घ्याव्या लागतील. सांयकाळच्या वेळी पाहुण्यांचे आगमन होईल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : कामावर लक्ष केंद्रित करा
मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात शुभ परिणाम मिळतील आणि तुम्हाला यशप्राप्ती होईल. तुमची प्रगची पाहून लोक अंचबित होतील. तुमच्या यशाला तुमची स्वतःची दृष्ट लागू शकते. प्रगतीची ही गती कायम ठेवल्याने तुम्हाला लाभ होईल. भविष्यात तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. त्यामुळे मानसन्मानापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे योग्य होईल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : तणावात वाढ
कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल पण आजचा दिवस एखाद्या चिंतेत व्यतित होईल. तुम्ही कुटुंबीयांसोबत वेळ घालवला आणि तुमच्या सन्मानात वाढ होईल. ऑफिसच्या कामाची चिंता सतावेल आणि तणावात वाढ होईल. आर्थिक चिंता तुम्हाला त्रस्त करेल. सर्वांची संमती असेल तर स्थान परिवर्तनाचा विचार करू शकता.
सिंह आर्थिक राशिभविष्य : आर्थिक चिंता सतावेल
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक चिंता सतावेल. व्यवसायामुळे तुम्ही फार चिंतेत असाल. मागील काही दिवसांपासून व्यवसाय नियमित नाही, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला आळस आणि आराम यांचा त्याग करावा लागेल, तरच तुमचे काम नीट चालेल. आजच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण करू नका.
कन्या आर्थिक राशिभविष्य : दिवसभर व्यस्त राहणार
कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस फार व्यग्रतेत जाईल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार धावपळ करावी लागेल. तुम्हाला यश मिळे आणि तुमची सर्व कामांत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही तुमची कामे जर उत्साहाने पूर्ण केली तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील. एखाद्या कामात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त चांगला करार होईल.
तूळ आर्थिक राशिभविष्य : विरोधकांना पराजित कराल
तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभ नाही आणि आज तुम्हाला कारण नसताना त्रास होईल आणि चिंता सतावेल. शुक्र ग्रहामुळे तुमच्या काही समस्या या वास्तवात आहेत, पण काही समस्या तुम्ही दूरदृष्टी न दाखवल्याने निर्माण झालेल्या आहेत. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या समोर विरोधकांची गर्दी असेल. तुम्ही तुमचे धाडस आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर या लोकांना पराजित करू शकाल. अंतर्मनाची दुर्बलता आणि दुर्गुणांचा त्याग करा.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : वेळ अनुकूल
वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभाचा राहील आणि आज तुम्हाला बऱ्याच चांगल्या बातम्या मिळतील, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ताणतणाव तुमच्यावर प्रभावी ठरणार नाही, आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. नवीन योजना यशस्वी होतील. जुने वादविवाद, भांडणे यातून सुटका होईल. अधिकारी वर्गाशी सामंजस्य वाढेल. निराशजनक विचार मनात येऊ देऊ नका. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.
धनू आर्थिक राशिभविष्य : आत्मविश्वास वाढेल
धनू राशीच्या लोकांना आज लाभ होईल आणि जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन संपर्कातून लाभ होईल आणि तुमच्या सन्मानात वाढ होईल. तुमचे अडकलेले पैसे बऱ्याच परिश्रमानंतर हाती येतील आणि रोजची कामे तुम्ही सहजतेने पूर्ण कराल. व्यावसायिक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही एकामागून एक कामे पूर्ण कराल. रात्रीच्या वेळी मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर आर्थिक राशिभविष्य : सामाजिक योगदानाबद्दल सन्मान
मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुमची सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. सामाजिक योगदानाबद्दल तुमचा सन्मान केला जाईल. ग्रहांची चाल तुमच्या भाग्यात सहायक ठरेल. खरेदीविक्रीच्या व्यवसायता लाभ होईल. दिवसभर शुभवार्ता मिळतील. मित्रांसोबत संबंध फार मजबूत होतील. अनावश्यक कटकटींपासून दूर राहा. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल आणि कुटुंबासोबत फिरायला जाल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धी होईल
कुंभ राशीच्या लोकांचा सन्मान होईल आणि आज तुमची धनवृद्धी होईल. जे लोक व्यवसाय करतात त्यांना लाभ होईल. आयात निर्यातीच्या व्यवसायात तुम्हाला लाभ होईल. धर्म आणि आध्यात्म यात रुची वाढेल. मंगलोत्सवाचे योग आहेत. वेळेचा सदुपयोग केला तर नशिब अधिक मजबूत होईल.
मीन आर्थिक राशिभविष्य : कामाशी संबंधित योजन यशस्वी होतील
मीन राशीच्या लोकांना आज लाभ होईल आणि आज तुमच्या कामाशी संबंधित योजना चांगल्या यशस्वी होतील. प्रगतीच्या क्षेत्रातील अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. वादग्रस्त प्रकरणं समाप्त होतील. तुम्हाला शत्रू तसेच तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी सावध राहावे लागणार आहे. सहकाऱ्यांशी सावध राहा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. आईवडील आणि गुरूंची सेवा करा. ध्यानधारणा करावी.