Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsApp चा नवा ‘चॅट फिल्टर’ लॉन्च; आता महत्वाचा मेसेज नाही चुकणार

12

व्हॉट्सॲपवर तुम्हाला दररोज खूप मेसेज येत असतील तर यातील अनेक मेसेज चुकतात. कधी-कधी तुम्ही व्यस्त असता, त्यामुळे त्या वेळी तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सॲप मेसेजला रिप्लाय देता येत नाही. हे टाळण्यासाठी व्हॉट्सॲपने नवीन चॅट फिल्टर फीचर लाँच केले आहे. हे फीचर जगभरात आणले गेले आहे.
हे चॅट फिल्टर फीचर चॅट्सचे वर्गीकरण All , unread आणि group यामध्ये करते. Google Play Store किंवा Apple App Store वरून ॲप अपडेट करून युजर्स व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरचा आनंद घेऊ शकतात.

कसे वापरायचे चॅट फिल्टर फीचर

सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल. तुम्ही अँड्रॉइड यूजर्स असाल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ॲप अपडेट करावे लागेल.
तुम्ही iOS युजर असल्यास, ॲप ॲपल ॲप स्टोअरवरून अपडेट केले जाऊ शकते.
यानंतर तुम्हाला चॅट ऑप्शनवर जावे लागेल. जिथे टॉपवर तुम्हाला All, Unread, Group असे तीन पर्याय मिळतील.
जर तुम्ही कोणताही मेसेज किंवा चॅट वाचले नसेल तर ते unread सेक्शनमध्ये जाईल.
याशिवाय ग्रुप मेसेज स्वतंत्रपणे पाहता येतात.
अशा प्रकारे युजरचा एक देखील मेसेज चुकणार नाही. तसेच तुमचे मेसेज ॲडव्हान्स मध्ये मॅनेज केले जातील.

WhatsApp द्वारे नोटिफिकेशन फीचर

WhatsApp द्वारे आणखी एका नवीन फीचरवर काम केले जात आहे, जे नोटिफिकेशन फीचर म्हणून ओळखले जाईल. हे फीचर यूजर्सला व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट्सबद्दल अलर्ट करेल. आजच्या काळात, तुम्हाला दररोज बरेच स्टेटस अपडेट मिळतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचे महत्त्वाचे स्टेटस तपासायला विसरता. या समस्येवर मात करण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे.हे व्हॉट्सॲपचे आगामी फीचर असल्याची माहिती आहे.हे फीचर जे व्हॉट्सॲप स्टेटस तुम्ही बघायला विसरलात त्याची माहिती देईल. या फीचरमध्ये युजरला त्याच्या आवडत्या मेसेजचे नोटिफिकेशन रिसिव्ह करण्याचा पर्याय दिला जाईल. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व लोकांकडून स्टेटस अपडेट्स मिळवायचे नसतील तर तुम्ही फक्त काही कॉन्टॅक्ट निवडू शकाल. यानंतर तुम्हाला त्याच मित्रांचे व्हॉट्सॲप स्टेटस दिसेल.व्हॉट्सॲप स्टेटस अपडेटच्या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही प्रत्येकाचे स्टेटस तपासण्यात तुमचा वेळ वाया घालवणार नाही. तसेच, तुमचे महत्त्वाचे व्हॉट्सॲप स्टेटस चुकणार नाहीत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.