Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्हॉट्सॲपने दिले IT नियम 2021 ला आव्हान
IT नियम 2021 अंतर्गत सोशल मीडिया मध्यस्थांनी चॅट्स ट्रेस करणे आणि माहितीचा पहिला प्रवर्तक (originator) ओळखण्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे.माहिती तंत्रज्ञान नियम 2021 (IT नियम 2021) ला आव्हान देताना व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की, व्हॉट्सॲप एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर युजर्सची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते. या फीचरमुळे मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे फक्त मेसेज पाठवणाऱ्या आणि रिसीव्हरलाच कळू शकते.
व्हॉट्सॲप एन्क्रिप्शनवर सरकारची भूमिका
सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वकील कीर्तिमान सिंह यांनी नियमांचा बचाव केला आणि सांगितले की, आजचे वातावरण पाहता मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एन्क्रिप्शन फीचरमुळे करोडो व्हॉट्सॲप युजर्स
व्हॉट्सॲपच्या वतीने वकील तेजस कारिया यांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही भारतात एक व्यासपीठ म्हणून काम करत आहोत. जर आम्हाला एनक्रिप्शन सेफ्टी फीचर तोडण्यास भाग पाडले गेले तर व्हॉट्सॲप भारत सोडेल.
तेजस कारिया म्हणतात की, व्हॉट्सॲपच्या एन्क्रिप्शन फीचरमुळे करोडो युजर्स व्हॉट्सॲप वापरतात. सध्या भारतात 40 कोटींहून अधिक व्हॉट्सॲप युजर्स आहेत. एवढेच नाही तर, नियमांमुळे केवळ एन्क्रिप्शन कमकुवत होत नसून यूजर्सची प्रायव्हसीही धोक्यात येत असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.व्हॉट्सॲपच्या वकिलाने सांगितले की, भारताशिवाय जगात कुठेही असा नियम नाही.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?
सोशल मीडिया मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंग ॲप्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रदान करतात, जे डेटा किंवा माहिती सुरक्षित ठेवतं आणि ट्रांझिट दरम्यान हॅकर्सपासून दूर ठेवतं. सिस्टम “एलियन” मध्ये संदेश एन्क्रिप्ट करते, ज्याचा उलगडा फक्त ते रिसिव्हरच्या डिव्हाइसद्वारे केला जाऊ शकतो.