Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Moto G Stylus 5G (2024)ची किंमत
Moto G Stylus 5G (2024) ची किंमत ३९९.९९ डॉलर (जवळपास ३३,००० रुपये) आहे. फोन Caramel Latte आणि Scarlet Wave कलर्स मध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा अमेरिकन बाजारात सादर केला आहे. फोनची विक्री ३० मे पासून सुरु होईल.
Moto G Stylus (2024)चे स्पेसिफिकेशन्स
Moto G Stylus 5G (2024) मध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यात १२०० निट्स पीक ब्राइटनेस मिळते आणि २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये बिल्ट इन स्टायलस मिळतो जो अनेक कामे करू शकतो.
फोनमध्ये मागे ५०एमपीचा मुख्य कॅमेरा आहे जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.
Moto G Stylus 5G (2024) मध्ये प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन ६ जेन १ ५जी चिपसेट फिट करण्यात आला आहे. यात ५जी कनेक्टिव्हिटी मिळते. सोबत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं २टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट देण्यात आला आहे.
मोटोरोलाच्या नव्या फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आहे जी ३०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन १५वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात टाइप सी, ३.५मिमी ऑडियो जॅक, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ ५.१ देखील आहे. फोन अँड्रॉइड १४ वर ऑपरेट करतो. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.