Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मद्यधोरण घोटाळ्यात केजरीवालांसह ‘आप’ही आरोपीच्या पिंजऱ्यात, ‘ईडी’ने आवळला कारवाईचा फास

12

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षालाही (आप) आरोपी बनविले. थेट आरोपपत्रात नाव आल्याने केजरीवाल यांच्यासह ‘आप’ अडचणीत आल्याचे चित्र आहे.सन २०२१-२२ मधील दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात ‘ईडी’चे हे आठवे आरोपपत्र असून, केजरीवालांवरील पहिले आरोपपत्र आहे. ‘ईडी’ने आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यातच ‘ईडी’ने तेलंगणमधील ‘बीआरएस’ पक्षाचे नेते आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता आणि इतर चार जणांविरुद्ध असेच आरोपपत्र दाखल केले होते. ‘ईडी’ने ताज्या आरोपपत्रात केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण ‘घोटाळ्या’चे मुख्य सूत्रधार म्हटले आहे. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे मंत्री, ‘आप’ नेते आणि इतरांच्या सहकार्याने घोटाळ्यात भूमिका बजावली, असा ‘ईडी’चा आरोप आहे. केजरीवालांबरोबरच ‘आप’चे नावही आता या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

‘अबकारी धोरण प्रकरणात गुन्ह्याच्या कथित रकमेसंदर्भात केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील मोबाइल संभाषण सापडले आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या मोबाइलचा व संगणकाचा पासवर्ड देण्यास नकार दिल्यानंतर हवाला ऑपरेटरच्या उपकरणांमधून हे संभाषण पुनर्प्राप्त करण्यात आले आहे’, असे ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले.

या प्रकरणी ‘ईडी’ने २१ मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने केजरीवाल हे सध्या तुरुंगाबाहेर आहेत. निवडणूक प्रचारासाठी केजरीवाल यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

‘केजरीवाल सप्ततारांकित हॉटेलमध्ये राहिल्याचा थेट पुरावा आमच्याकडे आहे. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीने त्यांचे हॉटेलचे बिल अंशतः भरले होते’, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले. दिल्लीचे हे उत्पादन शुल्क धोरण आता रद्द करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक या नात्याने केजरीवाल या कथित घोटाळ्यासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.
Swati Maliwal: ओएसडी विभवकुमार बेपत्ता; खासदार स्वाती मालिवाल मारहाणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु
मालीवाल प्रकरणामुळे
पक्ष अडचणीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी केजरीवाल यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विभव कुमार हे कारवाईच्या कचाट्यात सापडण्याचे संकेत आहेत. विभव कुमार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालीवाल प्रकरणामुळे ‘आप’च्या अडचणी वाढल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.