Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहावा टप्पा, इंडिया-एनडीएसाठी कमालीचा प्रतिष्ठेचा, भाजपपुढे विजयाच्या पुनरावृत्तीचे मोठे आव्हान

9

नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होत आहे. या ५८ जागांपैकी २०१९ मध्ये भाजप आणि एनडीएने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यावेळी विशेषतः हरियाणात परिस्थिती कमालीची बदलली आहे. भाजप आणि इंडिया आघाडीत यंदा थेट लढत असल्याने दोघांसाठीही हा टप्पा कमालीचा प्रतिष्ठेचा बनला आहे.

विजयाच्या पुनरावृत्तीचे महाआव्हान

शेवटच्या दोन टप्प्यात भाजपसमोर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आणि नवीन जागा जिंकण्याचे, असे दुहेरी आव्हान आहे. २५ मे आणि १ जून या दोन शेवटच्या टप्प्यांत ११५ जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील सर्वच्या सर्व तर पंजाबमध्ये फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. यंदा पंजाबात अकाली दलाने साथ सोडली तरी काँग्रेसमधील आयाराम भाजपला साथ देतील अशी पक्षनेतृत्वाला आशा आहे.
Lok Sabha Elections 2024: सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात

हरियाणातील सर्व १० जागा राखणे यंदा भाजपसाठी कमालीचे आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांची व जाट समाजाची भाजपवर मोठी नाराजी आहे. दिल्लीप्रमाणेच येथेही काँग्रेस व आम आदमी पक्षाची आघाडी आहे. जेजपीचे दुष्यंत चौताला यांनीही भाजपपासून फारकत घेतली आहे. सत्ताविरोधी लाटेमुळे भाजपने एेन निवडणुकीपूर्वीच येथे मुख्यमंत्री बदलले. मनोहर खट्टर यांच्याऐवजी ओबीसी समाजातील नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. हरियाणातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यात भरती होतात. यंदा विरोधकांनी अग्निवीर योजनेला मोठा मुद्दा बनवला आहे.
दिल्लीत ६२ आणि पंजाबमध्ये ९२ जागा आम्हाला जनतेने दिल्या, ते पाकिस्तानी आहेत काय? : केजरीवाल

दिल्लीत काय होणार?

सध्या दिल्लीतील सातच्या सात जागांवर भाजपचे खासदार आहेत, मात्र यावेळी काँग्रेस आणि आपच्या आघाडीचे आव्हान भाजपसमोर आहे. कथित दारु घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले तरी न्यायालयाने अंतरिम जामीन त्यांना दिल्यावर ते प्रचारात प्रचंड सक्रिय झाले. याच दरम्यान आप खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीवरून केजरीवाल यांना अडचणीत आणण्याची भाजपची रणनीती आहे. दिल्लीत काँग्रेसचे तीनपैकी फक्त जे पी अग्रवाल यांच्या विजयाची शक्यता लक्षात घेता भाजप येथे काँग्रेसवर कमी आणि आपवर मुख्य हल्लाबोल करत आहे.
केजरीवाल बाहेर आले… आणि पुढे!

इंडिया आघाडीचा हाय जोश

काँग्रेसने अखेरच्या दोन्ही टप्प्यात सारी ताकद पणाला लावली आहे. दिल्ली-हरियाणात त्यांना आपची साथ मिळाल्याने दोन्ही पक्षांच्या केडरचा हाय जोश दिसतो. उत्तर भारतातील दिल्ली-पंजाब-हरियाणा ही तीनही राज्ये काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. बहुतांश हरियाणा आणि हिमाचलात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. २०१९ मध्ये भाजपने या चार राज्यांमध्ये चंदीगड मिळून ३५ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. दोन जागा अकाली दलाच्या वाट्याला गेल्या. काँग्रेसला ८ जागा होत्या. ‘आप’ला जी एकमेव जागा मिळाली ते पंजाबातील जालंधरचे एकमेव खासदार सुशील रिंकू यांना भाजपने यंदा आपल्याकडे ओढले आहे.
Arvind Kejariwal : मला तुरुंगात टाकलं, म्हणजे तुम्हाला वाटलं पक्ष फुटणार, पण मोदीजी घडलं ते उलटंच, केजरीवालांची खोचक टीका

दिल्लीतील सातही जागांवर भाजपची हॅटट्रिक रोखण्यासाठी इंडिया आघाडीने सारी शक्ती पणाला लावली आहे. यावेळी मी झाडूचे बटण दाबेन आणि केजरीवाल पंजावर शिक्का मारतील असे प्रचारात राहुल गांधी म्हणाले तरी मालीवाल प्रकरणानंतर अखेरच्या दिवशी दोघांच्या संयुक्त सभेची कल्पना बारगळली.

भाजपने दहाही जागा जिंकलेल्या हरियाणात काँग्रेसने दीपेंद्रसिंह हुड्डा आणि कुमारी सेलजा यांसारखे मोठे चेहरे मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि अग्निवीर रद्द करणे यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची नाराजी देशात सर्वात जास्त पंजाब आणि हरियाणामध्ये आहे. काँग्रेसने यंदा कुरुक्षेत्राची जागा ‘आप’ला दिली आहे.

पंजाबमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमधून परनीत कौर आणि रवनीत सिंग बिट्टूंसह अनेक काँग्रेस नेते भाजपवासी झाले. आता माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वाडिंग, सुखपाल सिंग खैरा, सुखजिंदर सिंग रंधावा, खासदार अमर सिंग, गुरजित सिंग औजला, विजय इंदर सिंगला आणि धरमवीर गांधी यांच्यासह कांग्रेस मैदानात भक्कम उभा आहे.

सहाव्या टप्प्यातील कांही प्रमुख उमेदवार

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (अनंतनाग-राजौरी), मंत्री धर्मेंद्र प्रधान (संबलपूर, ओडिशा), मंत्री राव इंद्रजीत व अभिनेता राज बब्बर (गुडगाव), केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद), माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी (सुलतानपूर), मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार (ईशान्य दिल्ली), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र), बासुरी स्वराज (नवी दिल्ली), मनोहरलाल खट्टर (कर्नाल), कुमारी शैलजा आणि अशोक तंवर (सिरसा), अरविंद शर्मा व दीपेंद्रसिंह हुड्डा (रोहतक).

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.