Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Swami Samarth Upasana : स्वामीराज माझी माऊली! दर गुरुवारी स्वामींची अशी करा उपासना, भक्तांची इच्छा होईल पूर्ण
स्वामी समर्थ उपासना :
स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली… गुरुवार म्हटलं की, अनेकांच्या मुखात स्वामींच नाव हमखास असते. दर गुरुवारी अनेक भक्तगण श्रीदत्तगुरु आणि स्वामींची पूजा करतात.
स्वामींची नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी, दु:ख, भीती, चिंता, काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात.
स्वामींची लिला अपंरपार आहे. ते अनेकांना जगण्याचे बळ देतात. स्वामी प्रत्यक्ष रुपात नसले तरी, त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांचे असतित्व जाणवते. ‘श्री स्वामी समर्थ’ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मकता जाणवते.
दत्तगुरुंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांची दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्यनियमात पूजा, नामस्मरण केले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांची अनेक मठ आहेत. स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात. त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात. जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करुन पाहा.
1. दररोज घरात श्रीसूक्त पठन केल्याने धन-धान्याची कमतरता दूर होते. घरातील सुख-शांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो. तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो.
2. नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्रीगुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा. तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्रीनवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्रीगुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा.
3. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. मनातील भीती नाहीशी होते. स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते.
4. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते. अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते.
5. नि:शंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे | अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी||१||
स्वामींच्या या मंत्राचे पठण केल्याने जीवनात सुख येते. आर्थिक चणचण संपते, घरातील कलह थांबतो, विद्यार्थ्यांना यश मिळते. त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.