Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Historical Judicial Verdict: पत्नीकडे पतीचं पालकत्व, संपत्ती विकण्याचेही अधिकार; हाय कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, प्रकरण काय?

11

चेन्नई : पती कोमामध्ये असल्याकारणाने पत्नीला पतीच्या व्यतिरिक्त पालकत्व देण्याचा महत्वाचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने पतीनंतर पत्नीची गार्डियन (पालक) म्हणून नेमणूक केली आहे. जेणेकरून एक पत्नी आपल्या पतीची तब्येत खालावली असताना संपत्ती विकू शकते तसेच गहाण देखील ठेवू शकते. यातून कुटुंबाला आधार मिळू शकेल.

पती आपात्कालीन अवस्थेत असताना पत्नीला संपत्तीचे व्यवहार करण्याचे तसेच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे अवघड होऊन बसते. यातच आता न्यायालयाने पत्नीला व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
गर्भवती महिलेला वेदना असह्य, बसमध्येच केली प्रसूती, बसचालकासह डॉक्टरांची तारांबळ उडवणारा प्रसंग
चेन्नईतील एका महिलेने कोमात असलेल्या पतीच्या व्यतिरिक्त आपल्याला पालकत्व बहाल करावे, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. त्यामुळे महिलेने आपल्या अर्जात सांगितले होते की, तिचा पती गेल्या पाच महिन्यांपासून कोमात होता. अशा स्थितीत त्यांना बँक खाती चालवण्याची आणि स्थावर मालमत्ता गहाण ठेवण्याची किंवा ती विकण्याचीही परवानगी मिळावी. परंतु उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने महिलेचा हा अर्ज फेटाळला. यानंतर हा अर्ज दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला.
Shocking News: गरोदरपणात जडलं विचित्र व्यसन, बाळाच्या जन्मानंतर पोटदुखी असह्य; ऑपरेशननंतर डॉक्टर थक्क

न्यायालयाने आपल्या निरीक्षणात काय म्हटले?

न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती पी.बी. बालाजी यांच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी पार पडली. सुनावणीत न्यायमूर्ती म्हणाले, ‘कोमाच्या अवस्थेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीची काळजी घेणे सोपे नाही. यासाठी पैशांची गरज असतेच. या परिस्थितीत असलेल्या लोकांना त्यांच्या वैद्यकीय स्थितीची काळजी घेण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफची देखील आवश्यकता असते. अशा परिस्थितीत संपूर्ण भार महिलेच्या खांद्यावर पडला आहे. ही वस्तुस्थिती पाहता महिलेला दिलासा देणे गरजेचे आहे.’

सदर निरीक्षण नोंदवत न्यायालयाने महिलेला स्थावर मालमत्ता गहाण ठेवण्याची परवानगी दिली आहे. ज्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचे पालनपोषण करु शकेल आणि पतीच्या उपचाराच्या खर्चाचा भार देखील तिला उचलता येईल. यासोबतच न्यायालयाने हा अधिकार सशर्त असल्याचे सूचित आहे. ‘मालमत्ता विकल्यानंतर ५० लाख रुपये पतीच्या नावावर एफडी बनवून ठेवावेत. त्या रकमेवरील व्याज महिलेला बँकेतून काढता येणार आहे. ही एफडी महिलेच्या पतीच्या हयातीत लागू राहील,’ असे न्यायालयाने म्हटले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.