Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 2 जून 2024 : गुरु उदय! भगवान विष्णूची राहिल कृपा, आर्थिक चणचण संपणार, वाचा रविवारचे राशिभविष्य

10

Aaj Che Rashi Bhavishya 2 June 2024:
२ जून रविवार रेवती नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. अपरा एकादशी तिथी असल्यामुळे भगवान विष्णूची कृपा राहिल. यादिवशी कन्या आणि वृश्चिक राशीसह ४ राशींचे भाग्य अनुकूल असून आर्थिक चणचण संपेल. जोडीदाराशी संवाद साधाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून

मेष – नकारात्मक विचार टाळा

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. संपत्तीही वाढेल. तुमचा पूर्ण भर सामाजिक प्रश्नांवर असेल. लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कोणतेही काम पूर्ण केल्याने धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार आणणे टाळावे, अन्यथा त्रास होईल. पार्टनरशीपमध्ये काम करणे चांगले राहिल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा.

वृषभ – आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ - आनंदाची बातमी मिळेल.

आजचा दिवस तुमचा आदर वाढवणारा असेल. कुटुंबात सुरु असलेले वाद बाहेरील व्यक्तीसमोर सांगू नका. भावा-बहिणींकडून पूर्ण आनंद मिळेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळाल्याने आनंदी असाल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम असल्यामुळे वातावरण आनंदी राहिल. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकू येईल. बँकिग क्षेत्रात काम करणापे लोक बचत योजनांवर पूर्ण लक्ष देतील.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कापडात बांधून अर्पण करा.

मिथुन – भावनांवर नियंत्रण ठेवा

मिथुन - भावनांवर नियंत्रण ठेवा

आजचा दिवस तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. जवळच्या लोकांचा विश्वास सहजपणे जिंकू शकाल. अनावश्यक वादात पडू नका, समस्या येतील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यावसायिकांनी वेळ घालवू नका. बोलण्याच्या सौम्यतेमुळे तुमचा आदर वाढेल. घेतलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करा.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा

कर्क – काम वेळेवर पूर्ण करा

कर्क - काम वेळेवर पूर्ण करा

आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास असणार आहे. अभ्यासाबाबत अधिक जागरुक व्हाल. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या शोधात असणाऱ्यांना आजचा दिवस सामान्य असेल. व्यवहारात सावध राहा, कोणीतरी तुमच्याशी चुकीचा व्यवहार करेल. कोणतेही महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण करावे लागेल, अन्यथा अडचणी येतील. तुम्हाला काही गुप्त माहिती मिळू शकते.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीब लोकांना वस्त्र किंवा अन्नदान करा

सिंह – आर्थिक लाभ मिळेल

सिंह - आर्थिक लाभ मिळेल

आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पूरेपर फायदा होईल. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवाल जे तुमच्यासाठी चांगले राहिल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल. कामात यश मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ मिळेल. मानसिक शांती मिळेल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणाला दान करा.

कन्या – अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा.

कन्या - अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा.

आजचा दिवस तुमच्या पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. नशिबाच्या दृष्टिकोनातूनही दिवस चांगला जाईल. सर्व क्षेत्रात तुमचा वेग कायम राहिल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मोठ्यांचा सल्ला घ्यावा. कायदेशीर बाबींमध्ये सुरु असलेल्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळाला चंदानाचा टिळा लावा.

तुळ – मन प्रसन्न राहिल.

तुळ - मन प्रसन्न राहिल.

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. काही जुन्या योजना सुरु करु शकता. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. लहानांच्या चुका माफ कराव्या लागतील. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. राजकारणात काम करणाऱ्यांना फायदा होईल. कमी अंतराचा प्रवास होईल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा.

वृश्चिक – आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

वृश्चिक - आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

आजच्या दिवशी तुम्हाला अचनाक धनलाभ होईल. तब्येतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा समस्या येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाबद्दल वरिष्ठांशी वाद घालू नका, समस्या येतील. कायद्याशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुमचा विजय होईल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला रोज चपाती खाऊ घाला.

धनु- जोडीदारासोबत वेळ घालवाल.

धनु- जोडीदारासोबत वेळ घालवाल.

आजचा दिवस तुमच्यासाठी मेहनतीचा असेल. वैवाहिक जीवनातील अडथळ्यांपासून आराम मिळेल. तुमच्या जवळच्या लोकांशी जवळीक वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. दोघांमधील अंतर कमी होईल. स्थितेची भावना मजबूत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमची मित्रांशी जवळीक वाढेल. व्यावसायिक लोकांनी वेळेवर निर्णय घ्यावा.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.

मकर – विरोधकांचा सामना करावा लागेल.

मकर - विरोधकांचा सामना करावा लागेल.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. तुमच्यातील ऊर्जा योग्य कामासाठी वापरावी, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वर्तन ठेवावे. तुम्ही बजेट तयार केल्यास आर्थिक अडचणी कमी होतील. विरोधी लोकांशी सामना करावा लागेल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला

कुंभ – मित्रांसोबत वेळ घालवाल.

कुंभ - मित्रांसोबत वेळ घालवाल.

आजचा दिवस तुमची कला आणि कौशल्य सुधारण्याचा आहे. कोणतेही काम उत्साहाने पूर्ण केल्याने मन प्रसन्न राहिल. काही वैयक्तिक परिस्थितींवरही नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा त्रास होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थी त्यांच्या परिक्षेची तयारी करताना दिसतील. त्यात त्यांना यश मिळेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमान चालीसाचा पाठ करा

मीन – मोठ्यांच्या सल्ल्याचे पालन करा.

मीन - मोठ्यांच्या सल्ल्याचे पालन करा.

आजचा दिवस तुमच्यासाठी रोमांचकारी असेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा देकील पूर्ण होईल. तुमच्या मोठ्यांच्या सल्ल्याचे पालन करुन नाव कमवाल. कुटुंबातील कोणाशीही वाद घालू नका. नात्यात दूरावा येऊ शकतो. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करा. भौतिक गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. अनावश्यक वस्तू खरेदी कराल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.