Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असे सांगतानाच यावेळी मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या विजयाचे श्रेय अरुणाचल प्रदेशातील पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रयत्नांना दिले आहे.
दोन उमेदवार थोडक्या मतांनी पडले
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण १५ उमेदवार उभे होते. यापैकी तीन उमेदवार निवडून आले तर एक उमेदवार केवळ २ मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार २०० मतांनी पडला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकूण १०.०६ टक्के मते मिळाली
राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकूण १०.०६ टक्के मते मिळाल्याचे सांगतानाच ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी विधानसभा निवडणूक लढवणे हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरील विश्वास, दूरदृष्टी आणि अरुणाचल प्रदेशासमोरील गंभीर समस्या सोडविण्याची क्षमता दाखवत आहे. आम्ही पुढील पाच वर्षांसाठी नवीन विधानसभेची स्थापना करणार असून पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक प्रशासनाची तत्त्वे कायम ठेवण्याचा संकल्प केल्याचेही सांगितले.
लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि संपूर्ण सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही समर्पित
अजितदादा पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि संपूर्ण सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित काम करत आहे. सर्वसमावेशक शासन आणि प्रगतीशील धोरणांसाठी वचनबद्धतेसह, राष्ट्रवादी काँग्रेसने भारतातील सर्व नागरिकांसाठी चांगले भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
अरुणाचलमध्ये पुन्हा भाजप सरकार
अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान पार पडले होते. अरुणाचलमध्ये सत्ताधारी भाजपलाच जनतेती पुन्हा पसंती मिळाली असून मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सरकार स्थापित करणार आहे. अरुणाचलमध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार बनविणार आहे. येथे विधानसभा निवडणुकीत १० जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.