Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Whatsappवर मेसेज करुन बँक मॅनेजरला घातला 48 लाखांचा गंडा, जाणून घ्या कसा घडला स्कॅम

10

व्हॉट्सॲपवर फसवणुकीचा नवा प्रकार सुरू आहे. हे लोक तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करतात, नंतर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सल्ला आणि भरमसाट परताव्याचे अमिष दाखवून तुमच्याकडून पैसे उकळतात. अशाच एका प्रकरणात कोईम्बतूर येथील एका व्यक्तीची 48.57 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. सुरुवातीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता.

जे. कृष्णराज, वय 35 हे कोईम्बतूरचे रहिवासी आहेत ते पेशाने एक बँक मॅनेजर आहेत. १४ मार्च रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यात कृष्णराजला पार्ट टाइम नोकरी देऊ करण्यात आली. काही काळानंतर त्याने सांगितले की ते ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे अधिक पैसे कमवू शकता. कृष्णराजने काही अतिरिक्त पैसे मिळवण्याच्या लोभापोटी ते स्वीकारले. 14 मार्च ते 1 मे दरम्यान, त्याने एकूण 13 वेळा त्या व्यक्तीच्या खात्यात 48,57,115 रुपये जमा केले. मात्र त्यांनी त्यांचे पैसे परत मागितल्यावर त्या व्यक्तीने त्यांना आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. आपले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कृष्णराज यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

काय आहे हा स्कॅम?

व्हॉट्सॲपच्या मदतीने ही फसवणूक इतर अनेक शहरांमध्येही होत आहे. यामध्ये अज्ञात व्यक्ती व्हॉट्सॲपवर मेसेज करून पार्ट टाईम नोकरी देण्याचे आश्वासन देते. सहज पैसे कमावण्याचे आमिष मिळाल्यामुळे आणि लोक अडकतात.

स्कॅमर तुम्हाला ऑनलाईन शेअर मार्केटचे अमिष दाखवतो आणि व्यक्तीला त्यात भरपूर पैसे गुंतवण्याचा सल्ला देतो. कृष्णराज सोबतही असेल काहीसे झाली. जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले असता. त्यांना अजून पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

ऑनलाइन स्कॅम कसे टाळायचे

  • तुम्हाला नीट समजत नसलेल्या कोणत्याही गोष्टीत पैसे गुंतवू नका. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनी किंवा प्लॅटफॉर्मबद्दल संपूर्ण माहिती गोळा करा.
  • खूप लवकर भरपूर पैसे कमावण्याचे आश्वासन अनेकदा फसवे असते. अशा फंदात पडू नका.
  • तुमच्या बँक खात्याची माहिती, क्रेडिट कार्डची माहिती किंवा इतर कोणतीही आर्थिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या जोखीम आणि आर्थिक टार्गेटनुसार तो तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

फसवणूक झाल्यानंतर काय करावे?

  • समोरील व्यक्तीशी बोलणे थांबवा. – पोलिस आणि सायबर गक्राईम विभागाकडे तक्रार करा. त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या आणि त्यांना मेसेज आणि बँक व्यवहारांचे स्क्रीनशॉट देखील दाखवा.
  • फसवणुकीशी संबंधित सर्व पुरावे गोळा करा, जसे की मेसेज, ईमेल आणि बँक स्टेटमेंट.
  • तुमच्या बँकेलाही याबाबत कळवा आणि शक्य असल्यास पैसे परत मिळवण्यासाठी त्यांची मदत घ्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.